मुक्तपीठ टीम
गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा जरी मुस्लिम मतांना महत्व देत नाही. एकाही मुस्लिम कार्यकर्त्याला भाजपाने उमेदवारी दिल्याचा इतिहास नाही. पण काँग्रेससाठी राज्याच्या लोकसंख्येत ११ टक्के असणाऱ्या मुसलमान समाजाची मते महत्वाची असतात. वर्षानुवर्षे मुस्लिम मते मिळवणाऱ्या काँग्रेससमोर या मतांसाठी आता आप आणि एमआयएमचेही आव्हान असणार आहे.
गुजरातमध्ये मुसलमान मतदारांचं महत्व
- राज्याच्या एकूण ६.५ कोटी लोकसंख्येपैकी सुमारे ११ टक्के मुस्लिम आहेत.
- २५ विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम मते लक्षणीय आहे.
- गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजेच २०१७ मध्ये केवळ तीन मुस्लिम आमदार विजयी झाले आणि तिघेही काँग्रेसचे होते.
- मात्र, २०१२च्या विधानसभा निवडणुकीत केवळ दोन मुस्लिम आमदार विजयी झाले होते त्यामुळे २०१७ची संख्या चांगली होती.
- या वर्षाच्या सुरुवातीला, अल्पसंख्याक समाजाची मते मिळविण्यासाठी काँग्रेसने वांकानेरचे आमदार मोहम्मद पीरजादा यांची पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती.
- दोन दशकांहून अधिक काळ गुजरातमध्ये सत्ता गाजवणाऱ्या भाजपने मुस्लिम मतदारांच्या पसंतीचा विचार केला नाही.
- काँग्रेसने २०१७ मध्ये राज्यात सहा मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले होते.
- भाजप सहसा कोणत्याही मुस्लिम उमेदवाराला तिकीट देत नाही.
आप आणि एआयएमआयएमचीही मुस्लिम मतांवर लक्ष!
- यावर्षी गुजरातमधील विधानसभा निवडणूकीत चांगलीच रंगत दिसणार आहे.
- काँग्रेस आणि भाजपशिवाय आम आदमी पार्टी म्हणजेच ‘आप’ही रिंगणात आहे.
- काँग्रेससमोर मुस्लिम मतांसाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम), अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि इतर काही पक्षांचे आव्हान आहे.
- दुसरीकडे एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेकदा गुजरातला भेट देताना दिसत आहेत.
- त्यांचा पक्ष गुजरातमध्ये ३० जागा लढवणार असल्याचे सांगितले होते आणि त्यांनी सहा उमेदवारांची घोषणाही केली आहे.