Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुजरात विभानसभा निकाल: भाजपाचा दणदणीत विजय! बंगालातील डाव्यांच्या सर्वाधिक विजयांच्या विक्रमाशी बरोबरी!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
bjp

मुक्तपीठ टीम

गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती ती, गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुकांची. आज अखेर या निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. गुजरात विभासभा २०२२ निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज झाली. राज्यात पुन्हा एकदा भाजपची सातव्यांदा सत्ता आली आहे. हा विजय २००२ मधील विजयापेक्षा मोठा आहे. राज्यातील भाजपची ही आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. बंगालातील डाव्यांचा सर्वाधिक काळ सत्तेचा विक्रमाची बरोबरी भाजपाने केली आहे.

डाव्यांच्या विक्रमाशी भाजपाची बरोबरी!

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने १९७७ ते २०११पर्यंत सतत ७ वेळा विधानसभा निवडणुका जिंकण्याचा विक्रम केला होता. गुजरातमधील ताज्या विजयामुळे भाजपाने ७व्यांदा विजयाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

२०१७च्या तुलनेत यावेळी दोन्ही टप्प्यात कमी मतदान झाले. पहिल्या टप्प्यात ६०.२० टक्के लोकांनी मतदान केले होते, तर ५ डिसेंबर रोजी झालेल्या दुसऱ्या टप्प्यात ६४.३९ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

गुजरातमध्ये भाजप १८२ पैकी १५७ जागांवर आघाडीवर

  • गुजरातमध्ये भाजप सध्या १५७ जागांवर आघाडीवर आहे.
  • काँग्रेस १६ जागांवर तर आम आदमी पार्टी पाच जागांवर आघाडीवर आहे.
  •  इतर पक्ष ४ जागांवर आघाडीवर आहेत.

गुजरातमध्ये १२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री पदी शपथविधी सोहळा होणार आहे. भूपेंद्र पटेल पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यात पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील सहभागी होणार आहेत असे मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले.

“गुजरातची जनता भाजपसोबत होती आणि यापुढेही राहणार”- रिवाबा जडेजा

क्रिकेट रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजानेही भाजपच्या विजयावर जामनगरमध्ये रोड शो केला. तिने या विजयाचा आनंद साजरा करत म्हटले की, “गुजरातमध्ये भाजपने २७ वर्षे ज्या पद्धतीने काम केले आहे आणि विकासाचे मॉडेल उभे केले आहे, त्यामुळे जनतेलाही भाजपसोबत विकासाचा हा प्रवास पुढे नेण्याची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुजरातची जनता भाजपसोबत होती आणि भविष्यातही राहणार असेही ती म्हणाली.”


Tags: aapBJPCongressGujaratGujarat Vibhansabha Result 2022muktpeethआपकाँग्रेसगुजरातगुजरात विभानसभा निकाल २०२२घडलं-बिघडलंभाजपामुक्तपीठ
Previous Post

सन २०२३ च्या सार्वजनिक सुट्टया जाहीर

Next Post

थंडीत का वाढते ह्रदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण?

Next Post
HeartAttack

थंडीत का वाढते ह्रदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!