मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातल्या स्वचछता कामगारांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली होती. त्याव्दारे स्वच्छता कामगारांची सुरक्षितता सुनिश्चित करताना या तत्वांमध्ये पुढील गोष्टींचा आणि मुद्यांचा समावेश केला आहे.
- महापालिकेने आघाडीच्या योद्धांची सुरक्षा आणि त्यांचे कल्याण सुनिश्चित करणे- यामध्ये स्वच्छता कामगारांची आरोग्य तपासणी करणे तसेच त्यांना पीपीई संच प्रदान करणे आणि नियमित वेतन देणे यांचा समावेश आहे. लॉकडाउनमध्ये या कर्मचा-यांना काही कारणाने कामावर येणे शक्य झाले नाही, तरीही त्यांना नियमित वेतन देण्याचे निश्चित केले होते.
- कोरोना उद्रेक झाला त्या काळामध्ये कच-याचे सुरक्षित संकलन, त्यावर प्रक्रिया करणे आणि कच-याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे यासाठी पुरेसा पाणीपुरवठा करणे आणि स्वच्छता सेवा सुनिश्चित करणे.
- कोरोना च्या रूग्णांचे निदान, उपचार आणि रूग्णांच्या विलगीकरणाच्या काळामध्ये निर्माण होणारा कचरा हाताळणे आणि त्याची विल्हेवाट लावली जात आहे, याची खात्री करणे, यासाठी स्वच्छता कामगारांसाठी तसेच घनकचरा हाताळणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे यासाठी मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत.
सरकारने ‘मॅन्युअल स्कॅव्हेंजर’ म्हणून रोजगारावर बंदी आणून त्यांचे पुनर्वसन नियम 2013 (एमएस नियम, 2013) अधिसूचित केले आहे. या नियमानुसार काही गोष्टी निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये स्वच्छता कामगारांना सुरक्षा उपकरणे देणे, त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे अनिवार्य आहे. या नियमांनुसार गटार किंवा सेप्टिक टँक साफ करण्याचे काम करणा-या कामगारांनाही दहा लाख रूपयांचे विमा कवच प्रदान करण्यात येत असून त्याचा हप्ता नियोक्त्याने भरणे बंधनकारक आहे. अशी माहिती सामाजिक न्याय आणि अधिकार राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरामध्ये दिली.