Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पेट्रोल-डिझेलवर जीएसटी लागला तर महाराष्ट्राचे नुकसान, यूपी-गुजरातचा फायदा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Petroleum-price-Medium

मुक्तपीठ टीम

पेट्रोल-डिझेलच्या महागाईचा रोजच भडका उडत आहे. त्यामुळे जनप्रक्षोभ वाढत असल्याने इंधनाला वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटीअंतर्गत आणण्याची मागणी केली जात आहे. जर जीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश केला गेला तर सामान्य लोकांना त्याचा फायदा काही प्रमाणात नक्कीच होईल, पण त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यांचे नुकसान होईल आणि उत्तरप्रदेश आणि गुजरातसारख्या राज्यांना त्याचा फायदा होईल असा अंदाज आहे.

नेमका कुणाचा फायदा होईल आणि कुणाचा तोटा, हे समजून घेण्यासाठी आधी इंधनाच्या किंमती कशा ठरवल्या जातात ते समजून घेणे आवश्यक आहे:

  • पेट्रोल आणि डिझेल मुळात तेवढे महाग नसतात जेवढ्या दराने ग्राहकांना विकले जातात.
  • राज्यांचा आणि केंद्राचा असे दोन कर या इंधनांवर लागतात.
  • यावर केंद्र आणि राज्य सरकारचा कर इतका वाढला आहे की किंमत शंभरच्या आकड्याला स्पर्श करत आहे.
  • मूळ किंमतीवर दोनदा कर आकारला जात आहे.
  • सध्या पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत येत नाहीत, त्यामुळे प्रत्येक राज्यात वेगवेगळे कर वसूल केले जात आहेत.

संपूर्ण देशात समान कर समस्या काय आहे?

  • जीएसटी अस्तित्वात आला तेव्हा असे म्हटले होते की संपूर्ण देशात एकच कर लागू होईल.परंतु पेट्रोल-डिझेल, मद्य वगळले गेले.
    राज्यांना करवसुलीत काही हक्क असावेत, यासाठी ते आवश्यक मानले गेले.
  • राज्यांना विकास कामांवर खर्च करण्यासाठी निधी आवश्यक आहे.
  • त्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमधून पैसे उभे करणे तुलनेनं सोपे असते.
  • जाणकारांच्या मते जर इंधनांना जीएसटीत आणले तर केंद्र आणि राज्य सरकारांच्या अर्थसंकल्पातील अपेक्षित महसुलात फटका बसेल.
  • तसे पाहायला गेले तर हा फटका खूप मोठा नसेल. १ लाख कोटी रुपयांचा कर कमी होईल म्हणजेच जीडीपीचे केवळ ०.४% संकलन कमी होईल.
  • पण सर्वसामान्यांना पेट्रोलवर प्रतिलिटर १० ते ३० रुपयांचा दिलासा नक्कीच मिळू शकेल.
  • जीएसटीमधील हिस्सा मिळवण्याच्या बाबतीत राज्यांच्या तक्रारी असतात. त्यामुळे हमखास महसूल देणारे इंधन केंद्राच्या ताब्यात देण्यास ते तयार होतीलच असे नाही.

अनेक राज्यांना फटका, काहींना फायदा

  •  वेगवेगळ्या राज्यात लागू असलेल्या व्हॅट दराकडे नजर टाकल्यास सुमारे महाराष्ट्रासह १९ राज्यांचे १० ते १२ हजार कोटी रुपयांचे नुकसान होईल.
  • या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील कर जास्त आहेत. महाराष्ट्र अशाच राज्यांपैकी एक आहे. इंधने जीएसटीमध्ये आल्यास महाराष्ट्राला किमान दहा हजार कोटींचा फटका बसेल.
  • उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरातसह ११ राज्ये अशी आहेत जेथे पेट्रोल आणि डिझेलवरील कर तुलनेने कमी आहे.
  • पेट्रोल आणि डिझेल जीएसटीत आलं तर या राज्यांचे उत्पन्न वाढेल. त्यातही सर्वात जास्त फायदा उत्तरप्रदेशचा होईल. त्या राज्याचा अडीच हजार कोटींचा फायदा होईल.

Tags: GSTMaharashtrapetrolजीएसटीपेट्रोलपेट्रोल आणि डिझेलपेट्रोल-डिझेलमहाराष्ट्र
Previous Post

गुन्हे महत्तवाचे : 1)सायन येथील रुग्णालयातील एका नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका भामट्याने तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. अखेर या नर्सने अँटॉप हिल पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. विशेष म्हणजे विवाह जुळविणाऱ्या वेबसाइटवर ओळख झाल्यानंतर नागपूरचा हा तरुण नर्सच्या घरी येऊन तिच्या आई-वडिलांना भेटूनही गेल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. 2)दूध केंद्राला लावलेले सील काढण्यासाठी मद्याची बाटली आणि १५ हजार रुपये लाच मागणाऱ्या वरिष्ठ लिपिकाला एसीबीच्या पथकाने अटक केली. बापू चोरगे असे या अधिकाऱ्याचे नाव असून हा लिपिक आरेच्या गोरेगाव येथील डेअरीमध्ये कार्यरत आहे. 3)वढू खुर्द येथील माने वस्ती परिसरात मुलानेच आईचा प्रेयसीसोबत मिळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खून केल्यानंतर उसण्यापैशासाठी एका व्यक्तीने खून केल्याची मुलाने पोलिसांकडे खोटी फिर्याद दिली होती. पण, पोलिसांनी कौशल्याने तपास करून त्या मुलास अटक केली. सतत होणारा वाद व प्रेमात अडसर ठरत असल्यामुळे त्याने खून केल्याचे समोर आले आहे. 4) रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार अंबरनाथ पोलिसांनी उघड केला आहे. याप्रकरणी आयआरसीटीसीच्या एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत 5)मुंबईतील खार परिसरात चॉपरने मारहाण करुन लोकांना लुटणाऱ्या तिघांना अटक खार पोलीस आणि वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेला चॉपर जप्त करण्यात आला आहे.

Next Post

शिवसेनाप्रवेशानंतर उर्मिला बॉलिवूडमध्ये काय करणार?

Next Post
urmila matondkar

शिवसेनाप्रवेशानंतर उर्मिला बॉलिवूडमध्ये काय करणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!