Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

७२ कोटींच्या बनावट बिलांप्रकरणी जीएसटी विभागाकडून पुण्यातील व्यापाऱ्यास अटक

July 19, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Fake GST Invoice

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलासंदर्भात धडक मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत पुण्यातील मे. शिव स्टील ट्रेडर्सच्या दौलत शिवलाल चौधरी या व्यापाऱ्याला जवळपास ७२.६८ कोटींच्या बनावट खरेदी व विक्री बिलांचा व्यवसाय केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असल्याची माहिती वस्तू व सेवाकर विभागाने दिली आहे.            

या व्यापाऱ्याने बनावट खरेदी व विक्री बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडीट घेऊन व तसेच टॅक्स क्रेडीट पास ऑन करून शासनाचा १३.०८ कोटींच्या कर महसुलाची हानी केल्याने अटक करण्यात आली.             

वस्तू व सेवाकर विभागाकडील उपलब्ध विविध विश्लेषण प्रणालीच्या आधारे सखोल विश्लेषण करून करचोरांचा शोध घेण्यात आला. यात मे. शिव स्टील ट्रेडर्स या व्यापाऱ्याच्या विरोधात महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधात विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलासंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेंतर्गत दौलत शिवलाल चौधरी यांना दि. १३ जुलै २०२२ रोजी अटक करण्यात आली आहे.            

मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे यांनी या व्यक्तीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही धडक कारवाई राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर, राज्यकर उपायुक्त (अन्वेषण) सुधीर चेके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक राज्यकर आयुक्त, (अन्वेषण) हृषीकेश अहिवळे, चंदर कावळे, प्रदीप कुलकर्णी, श्रीकांत खाडे व अन्वेषण विभागातील राज्यकर निरीक्षक यांनी राबवली. या संपूर्ण कारवाई दरम्यान अप्पर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे, (पुणे क्षेत्र) यांचे मार्गदर्शन मिळाले.            

सर्वसमावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकवेगीरी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा कसून शोध घेत आहे. या मोहिमेत चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत २७ अटक कारवाया करण्यात आल्या आहेत.


Tags: Fake GST BillGSTMaharashtrapuneShivlal Chaudhariपुणेबनावट बिलमहाराष्ट्र
Previous Post

पुण्यातील शाळकरी मुलीवरील अत्याचाराच्या घटनेबाबत त्वरित चौकशी आणि कार्यवाहीचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंचे निर्देश

Next Post

‘खेड-भीमाशंकर’ आणि ‘बनकर फाटा-तळेघर’ रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा

Next Post
0Mumbai_Bhimashankar_Road_Wo (1)

‘खेड-भीमाशंकर’ आणि ‘बनकर फाटा-तळेघर’ रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!