Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘वझिर एक्स’ क्रिप्टोकरन्सी एक्स्चेन्जवर जीएसटी आयुक्तालयाची कारवाई, ४0 कोटीचा जीएसटी चुकवला! ४९कोटींचा दंड!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Wazir X' cryptocurrency exchange company

मुक्तपीठ टीम

मुंबई झोनच्या पूर्व मुंबई जीएसटी आयुक्तालयाने ४०.५ कोटी रुपयांचा जीएसटी चुकवल्याचे प्रकरण उघडकीला आणले असून वझीर एक्स या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजवर कारवाई केली आहे. जीएसटी कर,व्याज आणि दंडाची रक्कम म्हणून आयुक्तालयाने ४९.२० कोटी रुपये रोख रकमेच्या स्वरुपात वसूल केले आहेत.

 

वझीर एक्स हे विनिमय केंद्र मेसर्स झानमाई लॅब्ज प्रा लि. कडून चालवले जाते तर डब्लूआरएक्स हे क्रिप्टोकरन्सी चलन मेसर्स बिनान्स इन्वेस्टमेंट कंपनी लिमिटेड या सेशेल्समधील कंपनीच्या मालकीचे आहे. झानमाई लॅब्जने डिसेंबर 2017 मध्ये स्थानिक क्रिप्टोकरन्सी स्टार्ट अप म्हणून वझीर एक्सची नोंदणी केली होती.

 

हे विनिमय केंद्र व्यापाऱ्याला रुपये किंवा डब्लूआरएक्समध्ये व्यवहार करण्याचा पर्याय उपलब्ध करून देते. वझीरएक्स प्लॅटफॉर्मकडून डब्लूआरएक्स खरेदी करावे लागते. या विनिमय केंद्राकडून ग्राहक आणि विक्रेता या दोघांकडूनही कमिशनची आकारणी केली जात होती आणि रुपयावरील व्यवहारावर ०.२ टक्के तर डब्लूआरएक्स वर ०.१ टक्के आकारणी होत होती.

 

ट्रेडींग शुल्क, डिपॉझिट शुल्क आणि विथड्रावल शुल्क म्हणून ही कंपनी कमिशनमधून मोठ्या प्रमाणावर महसूल जमा करत होती असे चौकशीत आढळले. ही कंपनी रुपयावर मिळालेल्या कमिशनवर जीएसटी भरत होती मात्र डब्लूआरएक्स चलनावर मिळालेल्या कमिशनवर जीएसटी भरत नसल्याचे दिसून आले.

 

या व्यवहारावरील शुल्क म्हणून १८ टक्के दराने जीएसटी लागू होतो. अशा प्रकारे सुमारे ४०.५ कोटी रुपयांचा जीएसटी भरला गेला नव्हता. हा कर आणि व्याज आणि दंडासह एकूण ४९.२ कोटी रुपये रोख रकमेच्या स्वरुपात वझीरएक्सकडून जागीच वसूल करण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

 

मुंबई झोनच्या सीजीएसटी विभागाचे अधिकारी ई कॉमर्स, ऑनलाईन गेमिंग, नॉन फंजीबल टोकन आणि इतर उदयोन्मुख क्षेत्राशी निगडित व्यावसायिक व्यवहारांचा तपास त्यांच्याकडून होणाऱ्या संभाव्य करचुकवेगिरीची शक्यता लक्षात घेऊन अधिक काळजीपूर्वक करत आहेत.

 

मुंबई झोन अंतर्गत येणाऱ्या सर्व क्रिप्टोकरन्सी विनिमय केंद्रांची तपासणी सीजीएसटी विभाग करणार असून आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे.


Tags: GSTGST commisionaratemumbai zoneWazir Xजीएसटी आयुक्तालयवझिर एक्स' क्रिप्टोकरन्सी एक्स्चेन्ज
Previous Post

एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत घट, ग्राहकांना नव वर्षाची खास भेट!

Next Post

राज्यावरील कर्जात २८ टक्के वाढ! २०१८मधील ३ लाख ३५ कोटीचे कर्ज दोन वर्षात ४ लाख २८ हजारावर!

Next Post
mantralay

राज्यावरील कर्जात २८ टक्के वाढ! २०१८मधील ३ लाख ३५ कोटीचे कर्ज दोन वर्षात ४ लाख २८ हजारावर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!