Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

रिक्षाचालकांची भन्नाट कल्पना, उन्हाळ्यात रिक्षा गारेगार ठेवण्यासाठी छतावर हिरवेगार गवत!

April 18, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
green grass on the roof to of rickshaw warm in summer

मुक्तपीठ टीम

होळीनंतर भारतात खऱ्या उन्हाळ्याला सुरूवात होते. या एप्रिल महिन्यातच तापमान ४० अंशांवर पोहोचले आहे. भर उन्हात घराबाहेर पडणे म्हणजे डोकेदुखीच. तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेल आणि लिंबाच्या वाढत्या किमतींमुळे लोकांना आधीपासूनच घाम फुटत आहे. अशा परिस्थितीत माणूस थंड कसा राहिल? यासाठी एका रिक्षा चालकाने एक भन्नाट कल्पना लढवली आहे. खरं तर, या रिक्षावाल्याने उन्हात थंड राहण्यासाठी आपल्या रिक्षाला नवा लूक दिला आहे, त्यासाठी त्याने झाडे आणि गवताचा वापर केला आहे. यामुळे रिक्षा इतर रिक्षांपेक्षा कमी उष्णता घेते!

 

लोकांना रिक्षावालाची कल्पना आवडली

  • व्हायरल झालेल्या त्याच्या फोटोमध्ये ही ‘रिक्षा’ सर्वसामान्य रिक्षांपेक्षा खूपच वेगळी दिसते.
  • कारण त्यावर भरपूर हिरवळ आहे.
  • रिक्षा चालकाने रिक्षाच्या छतावर गवत उगवले आहे आणि कुंडीत काही रोपेही लावली आहेत.
  • रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उन्हात थंडावा मिळावा यासाठी या व्यक्तीने हे कृत्य केल्याचा दावा केला जात आहे.

 

उन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी रिक्षावाल्याचा जुगाड!

 

To beat the soaring summer heat, a auto driver has turned his rickshaw into a mini garden with a significant green cover
He says it will help his passengers stay cool in sorching heat
He is from #Assam
Similar autos also found in #Pune #Kolkata#Salute #Inspiring #BharatKeVeer pic.twitter.com/BhwVEGcvAr

— Srikanth Matrubai (@SrikantMatrubai) April 12, 2022

हा फोटो ट्विटर यूजर एरिक सोल्हेमने ४ एप्रिल रोजी शेअर केला होता. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘या भारतीय माणसाने उन्हाळ्यात थंड राहण्यासाठी त्याच्या रिक्षावर गवत वाढवले. खरंच… हे आश्चर्यकारक आहे!’ ट्विटरवर एरिक यांच्या पोस्टला २०.९ हजार लाईक्स आणि २ हजारांहून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्सनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

ट्विटरवरील यूजर्सच्या प्रतिक्रिया

  • या प्रकरणाला उत्तर देताना ट्विटर यूजरने लिहिले की, खरोखर ही एक आश्चर्यकारक कल्पना आहे. इतर रिक्षाचालकांनीही असेच केले पाहिजे. कारण एप्रिल महिना आहे आणि तापमान आधीच ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
  • त्याचवेळी, आणखी एका युजरने लिहिले की, आम्हाला रस्ते, गल्ल्या आणि वसाहतींमध्ये अशा रिक्षांची गरज आहे. आता तापमान वाढत आहे. हे थांबवण्यासाठी अशी आणखी पावले उचलण्याची गरज आहे. त्याचबरोबर अनेक लोक या रिक्षा चालकाच्या कल्पनेचे खूप कौतुक करत आहेत.
    अशा रिक्षा आणखी हव्यात!

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: assamGreen GrasskolkatapuneRickshaw driverरिक्षाहिरवेगार गवत
Previous Post

उन्हाच्या काहिलीत सुमधुर शीतल दिलासा देणारे ताडगोळे असतात कसे? किती उपयोगी?

Next Post

घर आणि सोसायटीतील कचऱ्याचं तिथंच कसं करावं व्यवस्थापन? मराठी विज्ञान परिषदेतर्फे प्रात्यक्षिकांसह व्याख्यान

Next Post
Solid Waste Management

घर आणि सोसायटीतील कचऱ्याचं तिथंच कसं करावं व्यवस्थापन? मराठी विज्ञान परिषदेतर्फे प्रात्यक्षिकांसह व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!