मुक्तपीठ टीम
ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात बंगळुरूच्या २२ वर्षीय क्लायमेट अॅक्टिव्हिस्ट दिशा रवीच्या अटकेनंतर पोलिसांनी तिच्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे. निकिता जॅकब आणि शांतनुविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार दिशा, निकिताने जूम अॅपवर खालिस्तानी समर्थक आणि पोएटिक जस्टिस फाउंडेशनचा फाउंडर एम.ओ. धालीवालसोबत मीटिंग केली होती. तसेच दिशाने त्यासाठी तयार केलेले टुल किट टेलीग्रामच्या माध्यमातून ग्रेटाला पाठवले आणि एका व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातूनही पसरवले.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,४ दिवसांपूर्वी एक स्पेशल टीम निकिताच्या घरी गेली होती. तेथून तिचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जप्त करुन तपास करण्यात आला. यानंतर पोलिस परत तिच्या घरी गेले असता, ती निघून गेली होती. अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर निकिताने मुंबई उच्च न्यायालयात ट्रांजिट बेलसाठी याचिका दाखल केली आहे.
दिशाने टूलकिट एडिट करून सर्क्युलेट केले – पोलिस
- ग्रेटा थनबर्गने शेअर केलेली टूलकिट एडिट आणि सर्क्युलेट केल्याबद्दल दिशाला अटक करण्यात आली आहे.
- दिल्ली कोर्टाने दिशाला ५ दिवसांच्या स्पेशल सेल कोठडीत पाठवले आहे. स्वीडनच्या पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवून ट्वीट केले आणि हे टूलकिट शेअर केले.
- यावर भारत सरकारने आक्षेप घेतल्यानंतर ट्विटरने हे ट्विट हटवले.
- यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दिशाने ग्रेटाबरोबर टूलकिट शेअर केले
- दिल्ली पोलिसांनी १४ फेब्रुवारी रोजी दिशाला अटक केली.
- दिशा ही एक क्लायमेट अॅक्टिवेस्ट आहे.
- दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रायडे फॉर फ्यूचर मोहिमेमध्ये सहभागी असलेल्या दिशाने गूगल डॉक तयार करून टूलकिट सर्कुलेट केले. त्यासाठी त्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला.
- या टूलकिटच्या ड्राफ्टिंगमध्येही ती सहभागी होती.
पोलीस कारवाईवर विरोधी नेत्यांची तीव्र टीका
चिदंबरम
‘भारत अर्थ नसलेल्या गोष्टींना प्राधान्य देत आहे आणि दिल्ली पोलिस हुकूमशहाच्या हातातील बाहूली बनली आहे.
जयराम रमेश
‘हे हीन दर्जाचे कारस्थान आहे. अनपेक्षित शोषणा आणि गुंडगिरी आहे.’
शशी थरूर
‘भारतातील शेतकरी आंदोलन दाबण्यासाठी ज्याप्रकारे राजकीय विरोध आणि वैचारिक स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे, दिशाची अटक त्यातील एक भाग आहे. सरकारला जगभरात आपली प्रतिमा मलिन होण्याची चिंता नाही ?’
सीताराम येचुरी
मोदी सरकारला असे वाटत असेल की, शेतकऱ्याच्या नातीला पकडल्यामुळे शेतकरी आंदोलन कमजोर होईल. पण, ही अटक देशातील तरुणांना जागे करेल आणि नवीन लोकशाहीची सुरुवात होईल.
अखिलेश यादव
‘जे लोक आपल्या शब्दांच्या टूलकिटने देश आणि समाजातील एकता तोडण्याचा प्रयत्न करतात, त्यांना कधी अटक होईल ?’
अटकेवर सरकारला प्रश्न विचारा – मीना हॅरिस
व्यवसायाने वकील असलेल्या मीना हॅरिस यांनी दिशाच्या अटकेवर केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी सोशल मीडियावर लिहीले की, ‘भारतीय अधिकाऱ्यांना अजून एक महिला कार्यकर्ती दिशा रवीला अटक केली, कारण तिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे टूलकिट पोस्ट केले. लोकांनी सरकारला विचारायला हवे की, फक्त आंदोलकांनाच का लक्ष्य केले जात आहे ?’