Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाशिकमधील द्राक्ष शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक

पालकमंत्री छगन भुजबळांचे कडक कारवाईचे आदेश

July 12, 2021
in घडलं-बिघडलं
0
chhagan bhujbal

मुक्तपीठ टीम

जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळवून देत. त्यांना दिलासा मिळवून द्यावा असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ग्रामीण पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

chhagan bhujbal

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, चांदवड, निफाड व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील फसवणूक झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आज भुजबळ फार्म येथील कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करत परिस्थिती समजून घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आदेश दिले आहेत.

chhagan bhujbal

यावेळी द्राक्ष उत्पादक शेतकरी संतोष आहेर, शरद मालसाने, रघुनाथ पाटील, सुनील शिंदे, त्र्यंबक कडलग, मधुकर मालसाने, हिरामण कदम, दौलत मालसाने यांच्यासह दिंडोरी, निफाड,चांदवड व त्र्यंबकेश्वर येथील शेतकरी उपस्थित होते.

chhagan bhujbal

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांना द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २०२०-२१ या हंगामातील दिंडोरी, निफाड, चांदवड व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची पाडवा अॅग्रो सोल्युशन या एक्सपोर्टर कंपनीकडून अडीच कोटी रुपयांहून अधिक रक्कमेची फसवणूक करण्यात आलेली आहे. याबाबत विविध पोलीस स्टेशन मध्ये तक्रार शेतकऱ्यांनी दाखल केलेली आहे. मात्र अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसून शेतकरी वर्गाला दिलासा देण्यात यावा असे म्हटले आहे.

chhagan bhujbal

त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जो नवीन कायदा करण्यात येत आहे. त्या कायद्यात शेतकऱ्यांची जे फसवणूक करणारे एक्सपोर्टर असतील किंवा स्थानिक व्यापारी यांनी फसवणूक केल्यास त्यांना कडक शिक्षेची तरतूद करण्यात यावी. तसेच व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांचे पैसे लवकर मिळावे यासाठी तरतुद करण्यात यावी अशी मागणी निवेदनात केलेली आहे.

 

 

 

 


Tags: farmersGrapes farmersMinister Chhagan Bhujbalधगन भुजबळपाडवा अॅग्रो सोल्युशन
Previous Post

इतर जातींसाठी असलेला न्याय मराठा समाजाला का नाही?

Next Post

“मराठा आरक्षण प्रश्नावर तीन पक्षांची राजकीय टगेगिरी”

Next Post
Ashish shelar

"मराठा आरक्षण प्रश्नावर तीन पक्षांची राजकीय टगेगिरी"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!