मुक्तपीठ टीम
आता लवकरच भारतात कोरोनावरील तिसरी लस मिळू लागेल. रशियाच्या स्पुटनिक-व्ही या कोरोनाविरोधी लसीला भारताने मान्यता दिल्याची बातमी आहे. या लसीचे दहा कोटी डोस तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे देशातील लसींच्या टंचाईवर मात करण्यास मदत मिळू शकेल.
भारतात सध्या लसीची टंचाई जाणवत आहे. सरकारी आणि इतर प्रयत्नांमुळे लोकांचा कल लसीकडे वाढत आहे. पण त्यामुळे सध्या उपलब्ध असलेला लसींचा पुरवठा पुरेसा ठरत नाही. सध्या देशात सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड आणि भारत बाायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सिन लस लोकांना उपलब्ध करुन दिली जात आहे. पण ती पुरत नाही. त्यामुळेच रशियाची लस ही फायद्याची ठरणार आहे.
पॅनेसिया बायोटेक ही रशियन कंपनीची स्पुटनिक-व्ही ही लस आहे. जगातील मान्यता मिळालेली ही पहिली लस आहे. दरवर्षी ही कंपनी स्पुटनिक-व्ही या कोरोनाविरोधी लसीचे १० कोटी डोस भारतात तयार करणार आहे.
रशियाच्या डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) आणि पॅनेसियासाठी भारतात डॉ. रेड्डीज लॅब या लसीचे उत्पादन करणार आहे. या लसीच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाने आरडीआयएफच्या आंतरराष्ट्रीय ग्राहकांनाही ती लस पुरवण्यास मदत होणार आहे.