मुक्तपीठ टीम
मुंबईत सफाई कर्मचारी आवासांसाठीच्या आश्रय योजनेत १८४४ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून १८४४ कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा भाजपाचा आरोप आहे. या संदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्त, महापौर व मुख्यमंत्री कार्यालयामध्ये तक्रार देऊनही अद्यापपावेतो काहीच कार्यवाही झालेली नाही. म्हणूनच राज्याचे संविधानिक प्रमुख राज्यपाल महोदयांकडे भाजपाने शनिवारी तक्रार केली आहे. तसेच राज्यपालांनी या संदर्भात राज्य सरकारला चौकशी करण्याचे आदेश द्यायला विनंती केली आहे.
भाजपाचे मिहिर कोटेचा, महानगरपालिकेतील पक्षनेते विनोद मिश्रा, नगरसेविका रिटा मकवाना, राजेश्री शिरवडकर, हर्षिता नार्वेकर, शीतल गंभीर, आशा मराठे, नगरसेवक महादेव शिवगण आणि आकाश राज पुरोहित यांचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटले.
Being a part of a delegation led by MLA @mihirkotecha & party leader @VinodMishra4U requested the honourable @maha_governor to strongly intervene and investigate the corruption matter of Rs. 1844 crores in #AshrayYojana housing scheme.Hoping necessary actions will be taken soon. pic.twitter.com/qvoIOCzrl3
— Harshita Narwekar (@HNarwekar) December 17, 2021
मुंबईतील सफाई कर्मचा-यांना मोफत घर मिळाले पाहिजे, अशी भाजपाची आग्रही भूमिका आहे. मुख्यतः सदर कंत्राटामध्ये महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तींना / कंपनीला जवळ जवळ दोन हजार कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामध्ये एकच निविदा मागविली असल्याने हे केंद्रीय सतर्कता आयोगाच्या दिशानिर्देशाचे उल्लंघन आहे.
Led delegation of @BJP4Mumbai councillors with @VinodMishra4U requested Hon. @maha_governor to intervene n order investigation in Rs1844 Cr scam in #AshrayYojana housing scheme for staff of waste management dept of @mybmc . @Dev_Fadnavis #MahaVasooliAghadi pic.twitter.com/cjAOKiFVRO
— Mihir Kotecha (@mihirkotecha) December 17, 2021
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपा शिष्टमंडळाला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश शासनाला देतील, असे आश्वासन दिले आहे.
भाजपाने आरोप केलेला १८४४ कोटींचा घोटाळा आहे तरी काय?
- मुंबई महापालिकेकडून सफाई कामगारांसाठीच्या घरांच्या योजनेत सत्ताधारी शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून १८४४ कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
- ऑक्टोबरमध्ये त्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी भाजपा नेत्यांनी केली होती.
- या घोटाळ्याची चौकशी राज्य शासनाने करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कोषाध्यक्ष मिहीर कोटेचा, मुंबई पालिकेतील भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
- १९८५ मध्ये लाड – पागे समितीने मुंबईतील सफाई कामगारांना हक्काची घरे देण्याची शिफारस केली होती.
- या योजनेत बांधल्या जाणाऱ्या घरांचा खर्च राज्य सरकार आणि मुंबई पालिकेने करावयाचा आहे.
- त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना १३० कामगारांना घरे दिली गेली.
- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीही मुंबईतील सफाई कामगारांसाठी नवी गृह योजना राबविण्याऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेतून घरे बांधण्याचाच निर्णय घेतला.
- मात्र मुंबई पालिकेत सत्तेत असलेली शिवसेना आश्रय योजनेखाली कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे काम करीत आहे.
- या योजनेखाली दिल्या गेलेल्या कंत्राटांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री , मुख्य सचिवांकडे केली आहे असेही शिंदे यांनी नमूद केले.
- या घोटाळ्याची राज्य शासनाने चौकशी न केल्यास केंद्रीय दक्षता आयोगाकडे , लोकायुक्तांकडे तक्रारी दाखल करून, वेळ आल्यास न्यायालयातही जाऊ असा इशारा भाजपा नगरसेवक विनोद मिश्रा यांनी दिला.