मुक्तपीठ टीम
हरियाणामध्ये नव्या कृषी कायद्यांचा विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची डोके फोडणारी अमानुषता दाखवणाऱ्या पोलीस कारवाईविरोधात संतापाचा भडका उडत आहे. शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारात जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकरी आणि विरोधकही आक्रमक झाले आहेत. आता त्यात भाजपामधूनही साथ मिळत आहे. मेघालयचे राज्यपाल आणि पूर्वाश्रमीचे भाजपा नेते सत्यपाल मलिक यांनी देखील या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला आहे. माझं राज्यपाल पद गेलं तरी चालेल, पण भाजपाने शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पोलीस लाठीमारात शेतकरी हुतात्मा
- या लाठीमारामध्ये शेतकरी सुशील काजल शनिवारी बसताडा टोल प्लाजा येथे गंभीर जखमी झाले होते.
- त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती.
- रात्री उशिरा ते उपचार सुरु असताना हुतात्मा झाले.
- किसान एकता मोर्चानं त्यांच्या हौतात्म्यासाठी सरकारला जबाबदार ठरवलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी- राज्यपाल मलिक
- “मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे.
- हरियाणाचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांवर लाठीचा उपयोग करत आहेत.
- मी वरिष्ठ नेत्यांना शेतकऱ्यांवर बळाचा वापर न करण्यास सांगितलं.
- केंद्र सरकारने बळाचा उपयोग नाही केला.
- एसडीएम आयुष सिन्हा यांना तात्काळ बरखास्त करायला हवं.
- ते एसडीएम पदासाठी लायक नाहीत.
- मात्र, सरकार त्यांचं समर्थन करीत आहे.
मी सरकारला घाबरत नाही
- राज्यपाल मलिक यांनी आंदोलनात मृत्यू झालेल्या कुटुंबांविषयी सरकारने संवेदना व्यक्त न केल्यानं नाराजी व्यक्त केली.
- “शेतकरी आंदोलन सुरू होऊन १ वर्षे पूर्ण झाला आहे.
- आतापर्यंत ६०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
- मात्र, सरकारमधील कुणाकडूनही शेतकऱ्यांचं सांत्वन करण्यात आलं नाही.
- हरियाणातील एका एसडीएमचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
- या व्हिडीओमध्ये बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना आंदोलकांची डोकी फोडण्याचा आदेश हे एसडीएम देताना दिसत आहेत.
- माझ्या वक्तव्यांसाठी मी सरकारला घाबरत नाही.
- मला राज्यपाल पदावर प्रेम नाही.
- मी जे बोलतोय ते मनापासून बोलतोय.
- मला शेतकऱ्यांकडे परत जावं लागेल असं वाटतंय.
नेमकं व्हिडीओमध्ये काय आहे?
- करनालमध्ये पोलिसांनी जागोजागी बॅरिकेट्स लावून, दांड्या बांधून रस्ते अडवले होते.
- तेथे उपस्थित सरकारी अधिकारी एसडीएम आयुष सिन्हा पोलिसांना आदेशाऐवजी चिथावणीखोर भाषा वापरताना दिसत आहेत.
- ‘ही नाकाबंदी तोडून कुणीही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मी सांगतो सरळ त्यांची डोकी फोडा.
- मी स्पष्ट सांगतो, डोकं फोडा. मी डेप्युटी मॅजिस्ट्रेट आहे.
- लिखित देतो.
- सरळ लाठीचार्ज करा, काही शंका? सरळ उचलून उचलून मारा.
- कोणतीही शंका नाही, कुठल्याजी आदेशाची गरज नाही.
- क्लिअर आहात तुम्ही.
- हा नाका कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुटू देणार नाही.
- आपल्याकडे पुरेसं बळ आहे. १०० जवानांची फौज आहे.
- इथं तुम्हाला सुरुवातीच्या बंदोबस्तासाठी उभं केलं आहे.
- कोणतीही शंका नाही. करणार ना लाठीचार्ज?
- इथून एकही माणूस गेला नाही पाहीजे.