Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टोमॅटो उत्पादकांच्या प्रश्नांबाबत समशेरपूर बाजार समितीत आंदोलन

August 30, 2021
in घडलं-बिघडलं
0
tomato

मुक्तपीठ टीम

टोमॅटोचे दर अचानक कोसळल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. टोमॅटो उत्पादकांना त्यांच्या अडचणीच्या काळात सरकारने तातडीने मदत करावी, एकरी किमान ५० हजार रुपयांचे तातडीने अनुदान द्यावे, या मागणीसाठी किसान सभा व समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अकोले येथील समशेरपुर बाजार समितीमध्ये तीव्र आंदोलन केले.

 

टोमॅटो दराचा प्रश्न सुटावा यासाठी, नेपाळ पाकिस्तान व बांगलादेश या शेजारील राष्ट्रांना टोमॅटोची निर्यात करण्यात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, महाराष्ट्राबाहेर इतर राज्यात टोमॅटोची कोठे मागणी आहे याचा तातडीने शोध घेऊन या राज्यांना टोमॅटो पुरविण्यासाठी महाराष्ट्राच्या पणन विभागाने तातडीने पावले उचलावीत, कोरोना लॉकडाऊनचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी टोमॅटो प्रक्रिया उद्योग बंद आहेत. विशेष प्रोत्साहन व सवलती देऊन हे उद्योग तातडीने सुरु करण्याबाबत सरकारने पावले टाकावीत, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना भावी काळात अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यायला लागू नये म्हणून बाजार समित्यांमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये कोल्ड स्टोरेजची उभारणी करावी, टोमॅटो उत्पादकांना माल तारण कर्ज उपलब्ध करून द्यावे, टोमॅटोचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पावले टाकावीत, टोमॅटो पिकासाठी वापरली जाणारी कीटकनाशके, विषाणू विरोधी औषधे, पोषके व खते यांची किंमत वाढवून कंपन्यांकडून टोमॅटो उत्पादकांचे अतोनात शोषण केले जाते. सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करून टोमॅटो उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व निविष्ठा, खते, कीटकनाशके योग्य दरात शेतकऱ्यांना मिळतील यासाठी हस्तक्षेप करावा या मागण्या यावेळी टोमॅटो उत्पादकांनी केल्या.

 

किसान सभा व समविचारी शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनामध्ये यावेळी परिसरातील शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने सामील झाले होते.

 

राज्यात सध्या टोमॅटो उत्पादकांवर प्रचंड संकट आले असताना राज्यातील सत्ताधारी व विरोधक मात्र भलत्याच विषयांवर एकमेकांवर चिखलफेक करत आहेत ही अत्यंत संतापजनक बाब आहे. राज्यकर्त्यांनी व विरोधकांनी या संकटाच्या काळात तरी एकमेकांवरील चिखलफेक थांबवावी व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याबद्दल गांभीर्याने पावले टाकावीत. असे जर झाले नाही तर मात्र सत्ताधारी व विरोधक दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या दारात टोमॅटो ओतण्याचे आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

 

डॉ. अजित नवले, संदीप दराडे,महेश नवले, सुरेश नवले, एकनाथ मेंगाळ, तुळशीराम कातोरे, पांडुरंग कातोरे, अविनाश धुमाळ, शंकर चोखंडे, तुकाराम मेंगाळ, दगु एखंडे, निवृत्ती नाना बेणके, सुनिल दराडे,आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


Tags: किसान सभाटोमॅटो उत्पादकडॉ. अजित नवलेसमशेरपुर बाजार समिती
Previous Post

“राणेंच्या माध्यमातून कोकणातील युवकांना रोजगार व व्यवसायामध्ये सुवर्ण संधी मिळणार”

Next Post

भाजपा सरकारची शेतकरीविरोधी अमानुषता! राज्यपालांनीच व्यक्त केला संताप!!

Next Post
Farmers Protest

भाजपा सरकारची शेतकरीविरोधी अमानुषता! राज्यपालांनीच व्यक्त केला संताप!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!