Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“शासकीय अधिकाऱ्यांनी प्रेम व सेवाभावाने कार्य करावे”: राज्यपाल

July 30, 2021
in सरकारी बातम्या
0
bhagat singh koshyari

मुक्तपीठ टीम

मातृत्वभाव म्हणजे वात्सल्य व प्रेमभावना. ही भावना केवळ महिलांकडे असते असे नाही तर प्रत्येकामध्ये असते. शासकीय कर्मचारी व अधिकारी यांनी आपले काम केवळ नौकरी म्हणून न करता मातृत्वभाव व सेवाभाव जागवून केले तर कामाचे सोने होईल, समाज उन्नत होईल व पुण्यार्जन देखील होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

 

पनवेल संघर्ष समितीच्या वतीने राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पनवेल, नवी मुंबई, मीरा-भाईंदर व भिवंडी येथे शासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ‘कोविड संजीवनी पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

Award

राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ नेत्रशल्यचिकित्सक डॉ तात्याराव लहाने यांसह १५ शासकीय अधिकारी व समाजसेवकांना कोविड संजीवनी पुरस्कार देण्यात आले.

 

रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीबद्दल दुःख व्यक्त करून राज्यपाल म्हणाले, करोना व अतिवृष्टी यांसारखी संकटे मनुष्याची परीक्षा घेण्यासाठी येत असतात. करोना काळात पोलीस शिपायापासून महासंचालाकांपर्यंत तसेच पटवाऱ्यापासून सचिवांपर्यंत सर्वांनी चांगले काम केले.  संकटकाळी मतभेत विसरून समाजासाठी व देशासाठी कार्य करण्याची उन्नत भावना यावेळी पाहण्यास मिळाली असे नमूद समाजाप्रती सेवाभाव असाच नेहमी कायम राहावा अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

Award

पनवेल संघर्ष समिती, अध्यक्ष कांतीलाल कडू व संपादिका निर्भीड लेख रूपा कांतीलाल कडू यांच्या कार्याचे कौतुक करताना समितीने आपले नाव ‘पनवेल सहयोग समिती’ असे करावे अशी सूचना राज्यपालांनी केली. कांतीलाल कडू यांनी प्रास्ताविक केले तर डॉ लहाने यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Award

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना त्यांच्या अनुपस्थितीत सन्मानित करण्यात आले. तर गणेश देशमुख, पनवेल महापालिका आयुक्त, डॉ गिरीशजी गुणे, मुख्य विश्वस्त गुणे  हॉस्पीटल,पनवेल, सुधाकर देशमुख, आयुक्त  भिवंडी महापालिका, डॉ प्रशांत रसाळ,  मुख्य कार्यकारी अधिकारी, कल्याण डोबिंवली स्मार्ट सिटी, सुजाता दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका, दत्तात्रेय नवले, प्रांताधिकारी, पनवेल विभाग, विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल, संजय शिंदे, उपायुक्त, मिरा भाईंदर महापालिका, शशिकांत तिरसे, कळंबोली प्रादेश‍िक परिवहन मोटार निरीक्षक, डॉ सच‍िन संकपाल, मुख्य अधिष्ठाता उपजिल्हा रुग्णालय पनवेल, डॉ प्रमोद पाटील, पनवेल उपजिल्हा रुग्णालयचे वैदयकीय अधिकारी, डॉ अर्चना राम थडानी, सामाजिक वैदयकिय तज्ञ व स्मिता गवाणकर, सूत्रसंचालक व वृत्तनिवेदिका यांना कोविड संजीवनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


Tags: COVID Sanjeevani Awardkantilal kadupanvelकांतीलाल कडूकोविड संजीवनी पुरस्कारडॉ. तात्याराव लहानेपनवेल संघर्ष समिती
Previous Post

सांगलीचा दौरा आटोपून देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात

Next Post

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांची नीलम गोऱ्हे यांनी केली पाहणी

Next Post
neelam gorhe

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांची नीलम गोऱ्हे यांनी केली पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!