Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘भानुशाली समाज भाग्यशाली’ कच्छी भानुशाली समाजाचे कोरोना काळातील सेवाकार्य कौतुकास्पद: राज्यपाल

September 5, 2021
in सरकारी बातम्या
0
governor

मुक्तपीठ टीम

व्यापार उदीमाद्वारे धनसंग्रह करून वाडी-इमल्या बांधणे कठीण काम नाही. परंतु ईश्वर कृपेने मिळालेली धनसंपदा आपल्याच उपेक्षित समाज बांधवांमध्ये निःस्वार्थपणे वाटणे हे श्रेयस्कर काम आहे, असे सांगून कच्छी भानुशाली समाजाने कष्टार्जित संपत्तीतून कोरोनाकाळात समाजासाठी केलेले सेवाकार्य कौतुकास्पद आहे, असे प्रशंसोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.

 

स्त्रियांसाठी कार्य करणारे जेडल फाउंडेशन व कच्छी भानुशाली सेवा समाजाच्या माध्यमातून कोरोनाकाळात उल्लेखनीय सेवाकार्य करणाऱ्या ३७ कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांचा यावेळी कच्छी टोपी व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

 

कार्यक्रमाला जेडल फाउंडेशनच्या अध्यक्षा विजया चांद्रा, कच्छी भानुशाली सेवा समाज न्यासाचे अध्यक्ष नरेश सेठीया, वल्लभदास भद्रा, डोंबिवली कच्छी भानुशाली मित्र मंडळाचे विश्वस्त – छायाचित्रकार नवीन भानुशाली, अनिल भद्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

 

भारताला संतांची मोठी परंपरा लाभली असून त्यांनी सांगितलेली जीवनमूल्ये भारतीय समाजाचा स्थायीभाव झाला असल्याचे सांगताना समाजाचे ऋण मान्य करणारा कच्छी भानुशाली समाज वास्तविक भाग्यशाली समाज आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

 

यावेळी नरेश धनजी शेठिया, वल्लभदास लीलाधर भद्रा, दिनेश लक्ष्मीदास चंद्रा, नवीन भानुशाली, अरविंद चंदुलाल चंद्र, राजेश पुरुषोत्तम जोईसर, धरमशीभाई, नारायण लक्ष्मीदास मिठीया, जितेंद्र परशोत्तम गजरा, मंजी प्रेमजी गजरा, सतीश हरीश भद्रा, भरत रमेश माव, वीरेन हरिराम गजरा, अनिल शेठिया, अमित मंगलदास मांगे, अनिल भद्रा, मेहुल नारायण भानुशाली, जगदीश जोईसर, जितेंद्र शंकरलाल शेठिया, राधा परिण जोईशर, परिन नवीनचंद्र जोइशर, जितेश वालजी भानुशाली, उमेश पुरुषोत्तम भानुशाली, रावाजी नानजी दामा, विशाल दयाराम गोरी, जेठालाल नानजी भानुशाली, मंथन खिमजी गजरा, राजेश बाबूभाई भानुशाली, दर्शन चंदुलाल हेमानी, खुशालभाई गडा, अमर वल्लभदास गजरा, दर्शना दामले, मकरंद प्रभाकर प्रधान, धर्मेंद्र नवनीतलाल शाह, निवा सेजल विशाल गडा यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 


Tags: governor bhagat singh koshyariभानुशाली समाजराज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Previous Post

तिसऱ्या लाटेबाबत विचारा प्रश्न, रविवारी टास्क फोर्स ऑनलाईन वैद्यकीय परिषदेत मिळणार उत्तरं

Next Post

“मी कोनाचा गुरू नाही, माह्या कोनी चेला नाही” असे म्हणणारे संत गाडगे महाराज मला जवळचे…पण शिकवणारे अनेक!

Next Post
sant gadage maharaj

"मी कोनाचा गुरू नाही, माह्या कोनी चेला नाही" असे म्हणणारे संत गाडगे महाराज मला जवळचे...पण शिकवणारे अनेक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!