Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यपालांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ

December 14, 2021
in घडलं-बिघडलं
0
Governor inaugurates Fund Raising Drive

मुक्तपीठ टीम

देशाचे जवान अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सीमेवर देशाचे रक्षण करीत असल्यामुळे देश सुरक्षित आहे. अनेक जवान प्राणांची आहुती देतात तर कित्येक जवान जायबंदी होतात. सैन्य दलातील हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांसाठी, सेवानिवृत्त जवानांसाठी तसेच अपंगत्व आलेल्या जवानांप्रती सरकार आपले कर्तव्य करीत असते. परंतु सशस्त्र सेना ध्वजदिन ही समाजाला सैनिकांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी असते. त्यामुळे समाजातील सर्व लोकांनी ध्वज निधीला आपले योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

Governor Koshyari inaugurates Armed Forces Flag Day Fund Raising Drive 3

मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे आयोजित सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राज्यपालांच्या हस्ते सोमवारी (दि १३) राजभवन येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला भारतीय नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे कार्यवाहू ध्वजाधिकारी व्हाईस एडमिरल कृष्णा स्वामिनाथन, महाराष्ट्र, गुजरात व गोवा प्रभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग ले. जन. एच.एस. कहलों, एअर ऑफिसर कमांडिंग मेरीटाईम एअर ऑपरेशन्स शिव रतन सिंह, प्रधान सचिव सीमा व्यास, मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी व सैनिक कल्याण विभागाचे संचालक प्रमोद यादव उपस्थित होते.

देशासाठी कार्य करताना जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी व लष्कराच्या अधिकारी व जवानांना वीरमरण आले. सर्व देश या हुतात्मा अधिकारी व जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे, असे राज्यपालांनी सांगितले.  यंदा कोरोना परिस्थितीमुळे सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाचे उद्दिष्ट पुरे झाले नसले तरीही कोरोना काळात लष्कर, प्रशासन, पोलीस, अधिकारी व समाजसेवकांनी चांगले काम केले असे राज्यपालांनी सांगितले.

Governor Koshyari inaugurates Armed Forces Flag Day Fund Raising Drive 2

यावेळी सन २०२०-२१ या वर्षात निधी संकलनात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या संस्था व व्यक्तींचा राज्यपालांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध संस्थांनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले.


Tags: Armed Forces Flag Fundraising Campaigngovernor bhagat singh koshyariराज्यपाल भगत सिंह कोश्यारीसशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिम
Previous Post

केंद्र सरकारची कबुली: मंजुरी मिळालेल्या १५७पैकी फक्त २ वैद्यकीय महाविद्यालये महाराष्ट्रात!

Next Post

“कैद्यांची मानसिकता बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आवश्यक”

Next Post
Dilip Walse-Patil's instructions on mindset of prisoners

"कैद्यांची मानसिकता बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आवश्यक"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!