Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कोरोना मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यात डॉक्टरांचे योगदान अद्भुत”- राज्यपाल

कृतज्ञता सोहळ्यात नामवंत डॉक्टरांचा राजभवन येथे सत्कार

October 14, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Governor Koshyari felicitates top doctors and surgeons at ‘Gratitude’ Ceremony

मुक्तपीठ टीम

जगात कोरोनाचे थैमान सुरु असताना भारतात कदाचित सर्वाधिक मृत्युदर राहील अशी परिस्थिती होती. परंतु पीपीई किट परिधान करून डॉक्टर्स, निवासी डॉक्टर तसेच नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मी यांसह सर्व कोरोना योद्ध्यांनी समर्पण भावनेने अद्भुत काम केल्यामुळेच देशातील मृत्युदर नियंत्रणात राहिला असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

 

राज्यपाल कोश्यारींच्या पुढाकाराने राजभवन येथे आयोजित ‘कृतज्ञता’ सोहळ्यात विविध क्षेत्रातील नामवंत डॉक्टरांचा राज्यपालांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कोरोना काळात सर्वत्र परीक्षा नको असा सूर असताना आपण परीक्षा घेण्याबाबत आग्रही राहिलो आणि वैद्यकीय परीक्षांसह सर्व परीक्षा घेतल्या गेल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले नाही व अधिक डॉक्टर्स उपलब्ध झाले असे राज्यपालांनी सांगितले.

Governor Koshyari felicitates top doctors

आजही जगातील कोरोना केसेसची आकडेवारी चिंताजनक असल्याचे सांगून नागरिकांनी कोविड प्रतिबंधक आचरण पाळण्याबाबत डॉक्टरांनी जनजागृती करावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. जागतिक आकडेवारीनुसार आजही जगात १.७० कोटी ऍक्टिव्ह कोरोना केसेस असून दररोज ४ लाख केसेस समोर येत आहेत. त्यामुळे कोरोना विरोधातील पवित्रा कायम ठेवावा लागेल असा इशारा नेत्रशल्य चिकित्सक डॉ.केकी मेहता यांनी यावेळी दिला.

 

राज्यपालांच्या हस्ते डॉ. केकी मेहता, डॉ. मिलिंद कीर्तने, डॉ. शशांक जोशी व डॉ. अमित मायदेव, केईएम हॉस्पिटलचे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. उदय खोपकर, फोर्टिस हॉस्पिटलचे संचालक डॉ. राहुल पंडित, बीकेसी जम्बो कोविड सेन्टरचे डॉ. राजेश ढेरे, वाडीया हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला, बॉम्बे हॉस्पिटलचे कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. राजीव नेरुरकर, लीलावती हॉस्पिटलचे डॉ. तुषार रेगे, बॉम्बे हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सुजित कोरडे, रिलायंस हॉस्पिटलच्या डॉ. रेखा डावर, बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. विक्रम करमरकर, मित्तल हॉस्पिटलचे डॉ. विनायक तायडे यांचा सत्कार करण्यात आला.

 

युवा हृदयरोग तज्ज्ञ डॉ. समीर पागाद यांनी प्रास्ताविक केले तर राज्यपालांच्या उपसचिव प्राची जांभेकर यांनी आभार प्रदर्शन केले.


Tags: Bhagatsingh koshyariBombay hospitalKEM HospitalMittal hospitalwadia hospitalकेईएम हॉस्पिटलबॉम्बे हॉस्पिटलभगत सिंह कोश्यारीमित्तल हॉस्पिटलवाडीया हॉस्पिटल
Previous Post

वैचारिक संकल्पाचा जागर : सांस्कृतिक सृजनकार

Next Post

महागाई कमी झाल्याच्या मुद्द्यावर सामनातून भाजपाची खिल्ली! जुमलेबाजी-आकडेबाजी नेहमीचाच खेळ!!

Next Post
sanjay raut - pm modi

महागाई कमी झाल्याच्या मुद्द्यावर सामनातून भाजपाची खिल्ली! जुमलेबाजी-आकडेबाजी नेहमीचाच खेळ!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!