Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्वरा भास्कर, हुमा कुरेशी यांसह ३५ महिलांना राज्यपालांच्या हस्ते पॉवरफुल वूमेन ऑफ द इअर पुरस्कार

March 8, 2022
in घडलं-बिघडलं
0
Governor Koshyari felicitates 'Powerful Women of the Year' 3

मुक्तपीठ टीम

महिलांना निसर्गतः बहुविध प्रतिभा लाभली आहे. आता जगात तसेच भारतात नव्या युगाचा उदय होत आहे. हे आगामी युग महिलांचे असेल असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

Governor Koshyari felicitates 'Powerful Women of the Year' 1            

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रातील महिलांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे ‘पॉवरफुल विमेन ऑफ द यिअर‘  पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. 

Governor Koshyari felicitates 'Powerful Women of the Year' 3            

मिड-डे वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अभिनेत्री स्वरा भास्कर, हुमा कुरेशी, मेघना घई – पुरी, पायल घोष, झारा यास्मिन, शिखा तलसानिया, अवंतिका खत्री, डॉ दुरु शाह यांसह ३५ महिलांना ‘पॉवरफुल विमेन ऑफ द यिअर‘ पुरस्कार देण्यात आले. यावेळी मिड-डे समुहाच्या राष्ट्रीय व्यवसाय विकास प्रमुख संगीता कबाडी व वरिष्ठ व्यवस्थापक राहुल शुक्ला उपस्थित होते.

            

स्त्री ही शक्तीचे रूप असून या विश्वाचे नियंत्रण मातृशक्तीच करीत असते. विद्यापीठांमधील सर्वच दीक्षांत समारोहात आज मुलीच ९० टक्के सुवर्णपदके प्राप्त करीत असून भारताला आत्मनिर्भर बनविण्यात महिलांचे योगदान मोठे असेल असे राज्यपालांनी सांगितले.

Governor Koshyari felicitates 'Powerful Women of the Year' 2            

घरकाम करणाऱ्या महिलांकडून आपण अनेक गोष्टी शिकलो. या महिला ४ – ५ घरांना  मदत करून स्वतःचे देखील घर सांभाळतात. या महिला म्हणजे स्त्रीशक्तीचे   शांत रूप असल्याचे स्वरा भास्कर यांनी सांगितले व आपल्या यशाचे श्रेय आपल्या घरकाम करणाऱ्या महिलांना दिले. यावेळी हुमा कुरेशी यांनी सर्व महिलांना काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण मिळावे ही अपेक्षा व्यक्त केली. संगीता कबाडी यांनी आभारप्रदर्शन केले.

            

यावेळी डॉ दुरु शाह, दीपशिखा देशमुख, इराम आफताब फरीदी, अंजली रैना, मीना सेठी मोंडल, सुजाता ढोले, डॉ विद्युल्लता नाईक, वनिता भाटिया, प्रेरणा उप्पल, शिला ठक्कर, केतकी राणे, शिल्पा शिवराम शेट्टी, सीमा धुरी रणखांब, झरीन मनचंदा, आसमा  सय्यद, आंचल जयधारा, प्रिया गुरुनानी, चंद्रिका शाह, गौरी भट्टाचार्य, डॉ मणिमेकलाई मोहन, अक्षता वर्मा, महेक पुरोहित, झैनाब शेख, स्मिता पुरोहित, नेहा कंधारी, ऍड मीनल खून, कोमल लालपुरीया, महेश धनावडे, संजीव ठक्कर व योगेश लाखनी यांचा सत्कार करण्यात आला.


Tags: governer bhagat singh koshyarimumbaiPowerful Women of the yearपॉवरफुल वूमेन ऑफ द इअरराज्यपाल भगत सिंग कोश्यारीस्वरा भास्करहुमा कुरेशी
Previous Post

शिवसेनाभवनात ४ वाजता कुणाचे वाजणार १२? संजय राऊतांची पुन्हा पत्रकार परिषद!

Next Post

महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन: विधान परिषद

Next Post
महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन: विधान परिषद

महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन: विधान परिषद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!