Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“राजस्थानी समाज युद्धभूमीवरही आघाडीवर आणि दान – पुण्य कार्यातही अग्रेसर” – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबईच्या राजस्थानी समाजातील कोरोना योद्ध्यांचा राजभवन येथे सन्मान

June 21, 2022
in सरकारी बातम्या
0
Governor felicitates Corona Warriors from Mumbai's Rajasthani community 2

मुक्तपीठ टीम

राजस्थानी समाजात एकीकडे महाराणा प्रतापांसारखे महाप्रतापी योद्धे झाले तर दुसरीकडे भामाशांसारखे महादानी आणि मीराबाईंसारखे संत निर्माण झाले. युद्धभूमीवर आघाडीवर असंणारा राजस्थानी समाज दान व पुण्य कार्यातही अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.

जीवनज्योती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राजभवन येथे मुंबईच्या राजस्थानी समाजातील डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, व्यापारी व समाजसेवकांना करोना काळातील सेवाकार्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते कोरोना वीर सन्मान प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी जीवनज्योती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र गुप्ता व उद्योजक धनराज अग्रवाल व्यासपीठावर उपस्थित होते.

आपण समाजाकडून काही ना काही घेत असतो त्यामुळे आपण समाजाला देखील देणे लागतो ही भावना राजस्थानी समाजात विशेषत्वाने पाहायला मिळते. राजस्थानी समाज उत्तराखंड, नेपाळ पासून तर अनेक देशात पसरला आहे. या सर्व ठिकाणी समाजाने तळे, विहिरी, शाळा व धर्मशाळा बांधून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. मुंबईसारख्या महानगरात देखील राजस्थानी समाजाने उद्यमशीलतेमुळे स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे असे राज्यपालांनी सांगितले. 

राज्यपालांच्या हस्ते मीरा भाईंदरचे वरिष्ठ स्त्री रोग विशेषज्ञ डॉ. शिवभगवान अग्रवाल,  वरिष्ठ समाज समाजसेवी – किशनलाल मोर,  शरद गोयनका, शल्य चिकित्सक डॉ. निरंजन अग्रवाल, शंकर मित्तल,  नगरसेवक तसेच नेत्र रोग विशेषज्ञ डॉ. सुशील अग्रवाल, श्रीमती शानू जोरावर सिंह गोहिल, उद्योगपती   नंदकिशोर अग्रवाल,  बाल रोग विशेषज्ञ डॉ. राजीव अग्रवाल, समाजसेवी रामवतार भूतड़ा, विजय डोकानियां,  सीए नारायण तोष्णीवाल, सीए विष्णु अग्रवाल,  उद्योगपती   राजकुमार केडिया, उद्योगपती  मनोज अग्रवाल, राजकुमार अग्रवाल,  मंगला सुरेश पुरोहित, नटवर डागा, प्रवीण मुकीम, दिनेश अग्रवाल, पवनकुमार शर्मा, जितेन्द्र गुप्ता, सीए मनोज खेमका, सुशील पोद्दार व जितेन्द्र कुमार कोठारी यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.


Tags: corona warriorgovernor bhagat singh koshyarimumbaiMumbai Rajasthani Communityमुंबई राजस्थानी समाजराजस्थानी समाजराज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Previous Post

आषाढी वारी पालखी सोहळ्यात होणार संविधानाचा गजर

Next Post

एकनाथ शिंदे… सामान्य शिवसैनिक ते सत्तेचा सरिपाट हलवणारा नेता!

Next Post
Eknath Shinde

एकनाथ शिंदे... सामान्य शिवसैनिक ते सत्तेचा सरिपाट हलवणारा नेता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!