Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रत्येक सिलिंडरमागे सरकारी तिजोरीत ३०३ रुपये, तरीही सामान्यांवर १२५ रुपयांच्या दरवाढीचा बोजा!

March 2, 2021
in घडलं-बिघडलं
0
cylinder

मुक्तपीठ टीम

गेल्या २५ दिवसांत गॅस सिलिंडरच्या किंमतीत सरकारने १२५ रुपयांची वाढ केली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सिलिंडरची किंमत ५२० रुपये होती. सिलिंडरच्या सध्याच्या किंमतीमधून ते कमी केले तर साधारण ग्राहकांना सुमारे ३०३ रुपयांचे अनुदान मिळायला हवे. असे झाल्यास सिलिंडर ग्राहकांना ८२३ ऐवजी ५२० रुपयांनाच पडेलं. यावरून असे लक्षात येते की, सरकार प्रत्येक सिलिंडरमागे एकूण ३०३ रुपये आपल्या तिजोरीत जमा करून घेत आहे.

महिन्याच्या सुरुवातीलाच (१ मार्च) घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत गेले चार दिवसात दुसऱ्यांदा २५ रुपयांनी वाढ केली आहे. या दरवाढीवर सरकाराचा तर्क आहे की, “आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजी सिलिंडरचे दर वाढले आहेत. त्यामुळेच गेल्या चार दिवसात घरगुती सिलिंडरचे दर दुसऱ्यांदा वाढविले आहेत”. एकीकडे पेट्रोल-डिझेलचे दर शंभरी पार करत आहेत. त्यातच घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे.

व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत वाढ

  • तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमतीत २५ रुपयांनी आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ९५ रुपयांची वाढ केली.
  • आता घरगुती गॅसची किंमत ८२३ रुपयांवर, तर व्यावसायिक सिलिंडरची किंमत १६२५ रुपयांवर गेली आहे.
  • कोरोना कालावधीत सिलिंडरवरील अनुदान बंद करण्यात आले.
  • त्यामुळे सरकार एका महिन्यात घरगुती गॅसवरील अनुदानावरून ३.३९ अब्ज रुपयांची कमाई करत आहे.
  • घरगुती गॅसवरही ५% जीएसटी आहे. त्यातूनही दरमहा सरकारला ४४ कोटी रुपये उत्पन्न मिळते.
  • व्यावसायिक सिलिंडरवरही सरकार १८% सबसिडी घेते.

दर वाढीचा राज्यांनाही होतोय फायदा

  • सिलिंडरवर लावण्यात येणाऱ्या जीएसटीच्या उत्पन्नाच्या निम्म्या पैशात राज्यांचा वाटा असतो.
  • सिलिंडरच्या किंमती वाढल्या की त्याचा फायदा राज्यांनाही होतो.
  • सरकारने अलीकडेच गॅसच्या किंमती ४ फेब्रुवारीला २५ रुपये, १४ फेब्रुवारीला ५० रुपये, २५ फेब्रुवारीला २५ रुपये आणि आता १ मार्च रोजी किंमतीत २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

मागील काही महिन्यातील किंमतींवर नजर

  • १ डिसेंबर २०२० च्या आकडेवारीवर नजर टाकली तर घरगुती गॅसची किंमत ६४८ रुपये होती, तर व्यावसायिक सिलिंडरचे दर १३०७ रुपये होता.
  • १५ डिसेंबर रोजी सरकारने किंमती वाढवल्या. तेव्हा घरगुती गॅसची किंमत ६९८ रुपये होते. तर व्यावसायिक गॅसची किंमत १३४३.५० रुपयांवर पोहोचली होती.
  • १५ जानेवारी रोजी, जेथे घरगुती गॅसची किंमक ६९८ रुपये होते, तर व्यावसायिक गॅसची किंमत १५५० रुपये होती.

Tags: Household gas cylinderघरगुती गॅस सिलिंडरव्यावसायिक सिलिंडर
Previous Post

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज कोणती प्रश्नोत्तरे झाली?

Next Post

“खासदार मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करा!”

Next Post
nana patole

"खासदार मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करा!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!