Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना महामारीमुळे सरकारचा तृतीय पंथियांनाही मदतीचा हात

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
transgender

मुक्तपीठ टीम

देश कोरोनाविरोधात लढा देत असताना उपजीविकेची गंभीर समस्या निर्माण झाल्याने तृतीयपंथीय लोकांवरही या महामारीचा परिणाम झाला आहे. या उपेक्षित वर्गाला अन्न आणि आरोग्यासारख्या मूलभूत गरजांच्या भीषण कमतरता सहन करावी लागते आहे. तसेच त्यांना बिकट परिस्थितीला तोंड द्यायला भाग पाडत आहे.

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी निर्वाह भत्ता

सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तृतीयपंथीय समुदायाच्या सदस्यांनी सरकारची मदत आणि पाठिंबा मिळविण्याकरिता व्यथा कथन करणारे दूरध्वनी आणि ईमेल केले आहेत. तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी नोडल मंत्रालय असलेल्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाने प्रत्येक तृतीयपंथीयाला त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्वरित आधार म्हणून १५०० रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. ही आर्थिक मदत तृतीयपंथीय समुदायाला त्यांच्या रोजच्या गरजा भागविण्यास मदत करेल. तृतीयपंथीय व्यक्तींसाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था आणि समुदाय आधारित संघटना (सीबीओ) यांना या उपक्रमाविषयी जनजागृती करण्यास सांगितले गेले आहे.

अर्ज कसा करावा?

तृतीयपंथीय व्यक्तींच्या वतीने कोणतीही तृतीयपंथीय व्यक्ती किंवा सीबीओ https://forms.gle/H3BcREPCy3nG6TpH7 या अर्जामध्ये मूलभूत तपशील, आधार आणि बँक खाते क्रमांक प्रदान केल्यानंतर आर्थिक मदतीसाठी अर्ज करू शकतात. सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स या स्वायत्त संस्थेच्या संकेतस्थळावर हा अर्ज उपलब्ध आहे. यासंदर्भातील माहिती जास्तीत जास्त तृतीयपंथीय व्यक्तींपर्यंत पोहोचावी यासाठी स्वयंसेवी संस्था आणि सीबीओच्या मदतीने हा अर्ज समाज माध्यमांवर प्रसारित केला जात आहे.

 

गेल्या वर्षीही टाळेबंदी दरम्यान मंत्रालयाने तृतीयपंथीय व्यक्तींना अशीच आर्थिक मदत आणि शिधा सामान पुरविले होते. एकूण ९८ लाख ५० हजार रुपये खर्चून देशभरातील जवळपास सात हजार तृतीयपंथीय व्यक्तींना त्याचा फायदा झाला.

समुपदेशन सेवा हेल्पलाइन

मानसिक आरोग्य समस्येचा सामना करणार्‍या लोकांना त्याविषयीच्या गैरसमजांमुळे मदत मिळविण्यास संकोच वाटत असल्याने मानसिक समर्थन आणि मानसिक आरोग्य सेवेसाठी सध्याच्या महामारीत पीडित तृतीयपंथीय व्यक्तींसाठी एक विनामूल्य हेल्पलाइन सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाने जाहीर केली आहे. कोणताही तृतीयपंथीय व्यक्ती हेल्पलाईन क्रमांक 8882133897 वर तज्ञांशी संपर्क साधू शकेल. ही हेल्पलाईन सोमवार ते शनिवार सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत कार्यरत असेल. त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी या हेल्पलाइनवर व्यावसायिक मानसशास्त्रज्ञ समुपदेशन सेवा प्रदान करतील.

तृतीयपंथीयांचे लसीकरण

विद्यमान कोरोना लसीकरण केंद्रांमध्ये तृतीयपंथीय व्यक्तींमध्ये कोणताही भेदभाव होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मंत्रालयाने सर्व राज्यांच्या प्रधान सचिवांना एक पत्रही लिहिले आहे. विशेषतः लसीकरण प्रक्रियेबद्दल त्यांना माहिती देण्यासाठी व त्यांच्यामधील जागरूकता सुनिश्चित करण्यासाठी वेगवेगळ्या स्थानिक भाषांमध्ये तृतीयपंथीय समुदायापर्यंत जनजागृती मोहीम राबविण्यास त्यांना विनंती केली गेली आहे. हरियाणा व आसाम प्रमाणे तृतीयपंथीय व्यक्तींच्या लसीकरणासाठी स्वतंत्र मोबाइल लसीकरण केंद्रे किंवा बूथ आयोजित करण्याची विनंती राज्यांना करण्यात आली आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Corona crisisgovernmenttransgenderतृतीयपंथीप्रशासन
Previous Post

कोरोनाशी डॉक्टरांचे युद्ध, उपचारच नाही संगीतानेही मनाला उभारी

Next Post

#मुक्तपीठ मंगळवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post
good news morning bulletin

#मुक्तपीठ मंगळवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!