मुक्तपीठ टीम
मुंबई मनपाच्या आश्रय योजनेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी प्रकरणी पुन्हा एकदा राज्यपाल भगत सिंग कोश्यारी आणु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यपाल कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नवा झटका देत मुंबई मनपाच्या आश्रय योजनेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांनी लोकायुक्तांना दिले आहेत. मुंबई मनपाच्या आश्रय योजनेत १ हजार ८४४ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा आमदार मिहीर कोटेचा आणि काही नगरसेवकांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
- आश्रय योजनेतंर्गत सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरं बांधण्यात येणार आहेत.
- सफाई कामगारांच्या ३९ वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.
- या आश्रय योजनेत आतापर्यंत १ हजार ८४४ कोटी रुपयांचे प्रस्ताव मनपात मंजूर झाले आहेत.
- हे प्रस्ताव मंजूर होत असताना भाजपाने त्यावर आक्षेप नोंदवला होता.
- त्यानंतरही प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर भाजपाचे स्थायी समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.
- या तक्रारीची दखल घेऊन राज्यपालांनी या प्रकरणात लोकायुक्तांना चौकशी करण्याची सूचना केली.
काय म्हणाले अजित पवार?
- राज्यपालांनी काय निर्णय घ्यावा, हा त्यांचा अधिकार आहे.
- तक्रारीत तथ्य नसेल तर तेही सत्य बाहेर येईल.
- मुंबई मनपात शिवसेनेची सत्ता आहे आणि भाजपा चौकीदाराच्या भूमिकेत आहे.
- त्यामुळं आश्रय योजनेतला भ्रष्टाचार बाहेर काढत असल्याचं भाजपाचे म्हणणंय.
- आता हे प्रकरण राज्यपालांनी लोकायुक्तांकडे दिल्यानं, मुख्यमंत्र्यांनाच धक्का दिल्याची चर्चा आहे.
- तसंही उद्धव ठाकरे आणि भगतसिंह कोश्यारींमध्ये नुकत्याच झालेल्या लेटरवॉरवरुन संबंध ताणले गेलेत.
- त्यावरुन भाजपचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.