मुक्तपीठ टीम
आपल्यापैकी प्रत्येकाचे काही ना काही स्वप्न आहे. पुढे जाऊन कोणते करिअर निवडायचे आणि त्यात कसे भविष्य घडवायचे याचा विचार प्रत्येकजणच करतो. हे स्वप्न पूर्ण करण्याचाही ते प्रयत्नही करतात. स्वप्न पाहणे सोपे असले तरी ते पूर्ण करणे तितकेच अवघड असते. केरळमधील एका मुलीने लहानपणी हवाई सुंदरी बनण्याचे स्वप्न पाहिले आणि तिने ते पूर्ण केले. गोपिका गोविंद असे या मुलीचे नाव आहे. गोपिका ही हवाई सुंदरी बनणारी केरळमधील पहिली आदिवासी महिला आहे. तिचे यश त्या मुलींसाठी एक उदाहरण बनले आहे ज्यांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी करण्याची इच्छा आहे.
केरळची पहिली आदिवासी हवाई सुंदरी गोपिका गोविंद
- केरळची पहिली आदिवासी हवाई सुंदरी बनलेल्या गोपिका गोविंदचा जन्म १९९८ मध्ये वकुन कुडी, एसटी कॉलनी, अलाकोडे येथील अनुसूचित जमाती वर्गात करिमबाला समुदायात झाला.
- तिच्या वडिलांचे नाव पी. गोविंदन आणि आईचे नाव विजी आहे.
- ढासळत्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे संपूर्ण बालपण गरिबीत आणि वंचिततेत गेले. असे असूनही तिच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व चांगलेच उमगले होते.
- त्यामुळे पालकांनी मुलीला अभ्यासासाठी प्रवृत्त करत केले. यासोबतच त्यांनी आपल्या मुलीला यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी मदत केली.
- गोपिकाचे बालपण आणि शालेय जीवन फारसे रंगतदार नव्हते. बहुतेक आदिवासी मुलींच्या बाबतीत असेच असते, पण तिच्या मेहनतीने आणि समर्पणाने तिने हवाई सुंदरी होण्याचे तिचे स्वप्न अखेर साकार केले.
लहानपणी पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरवले…
- जेव्हा गोपिकाने हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न पाहिले तेव्हा ती आठवी इयत्तेत शिकत होती आणि ती फक्त १२ वर्षांची होती.
- केरळमधील आदिवासी समाजातील गोपिकासाठी असे स्वप्न पाहणे ही मोठी गोष्ट होती.
- ती म्हणते- ‘मी लहान असताना माझ्या छतावरून विमान जायचे आणि त्या दिवसापासून मला स्वप्न पडू लागले की एक ना एक दिवस मीही विमानातून प्रवास करेन.
- तेव्हापासून मला हवेत उडण्याची स्वप्ने पडू लागली. आकाशात उडणारे विमान पाहिल्यावर मला खूप उत्साह वाटायचा.
- गोपिकाने तिच्या बालपणीचे स्वप्न नेहमीच जपले. मोठे झाल्यानंतर हवाई सुंदरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने याबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.
- हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी खूप खर्च करावा लागणार असल्याचे तिला समजले. अशा स्थितीत तिने क्षणभर हे स्वप्न सोडण्याचा निर्णय घेतला होता.
- परंतु, जेव्हा तिने स्वप्न सोडण्याचा विचार केला तेव्हा तिला कळले की केरळ सरकारकडून अनुसूचित जातीच्या मुलींच्या शिक्षणासाठी अनुदान दिले जाते.
- त्यावेळी ती कन्नूरच्या एसएन कॉलेजमध्ये एमएससी केमिस्ट्रीचे शिक्षण घेत होती.
- त्यानंतर गोपिकाने IATA कस्टमर सर्व्हिस केअरमधून डिप्लोमा कोर्स पूर्ण केला आणि त्यानंतर वायनाडमधील ड्रीम स्काय एव्हिएशन ट्रेनिंग अकादमीमध्ये प्रवेश घेऊन तिच्या अभ्यासाला सुरुवात केली.
राज्य सरकार अनुसूचित जातीच्या मुलींना शिक्षणासाठी अनुदान देत असल्याने गोपिकाला सरकारकडून एक लाख रुपयांचे अनुदानही देण्यात आले, ज्यामुळे तिला तिच्या अभ्यासात खूप मदत झाली. आता ती लवकरच एअर इंडिया एक्सप्रेस जॉईन करणार आहे. ती सर्वांसाठी एक आदर्श बनली आहे.