मुक्तपीठ टीम
गुगलने आता शुक्रवारी जाहीर केले की ते लवकरच सायबर सिक्युरिटी प्रोटेक्शन फीचर लॉन्च करणार आहे, जे हाय-प्रोफाइल लोकांचे सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करेल. नुकतीच चौदा हजार जीमेल वापरकर्त्यांवर साइबर हल्ला झाल्याचे उघड झाले. तेव्हा गुगलने अशा प्रकारच्या सायबर सुरक्षा संरक्षणाची घोषणा केली. रशियन सरकारी गट APT28 ने हे सायबर हल्ले केल्याचा आरोप आहे.
हाय-प्रोफाइल लोकांची हेरगिरी होणार नाही
- गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये स्पष्ट केले की, हाय प्रोफाइल व्यक्ती आणि गटांवर सायबर हल्ल्यांची संख्या वाढत आहे.
- वापरकर्त्यांना कंपनी अतिरिक्त संरक्षण देईल.
- यासाठी, कंपनी एक स्वतंत्र टीम तयार करेल, जी वापरकर्त्यांना जगातील धोकादायक हल्ल्यांविषयी चेतावणी देईल.
- अशा कामासाठी गुगल अग्रगण्य सायबर सुरक्षा संस्थेसोबत काम करेल.
गुगल जागतिक दर्जाची सुरक्षा व्यवस्था आणणार
- कंपनीचा दावा आहे की त्याची सुरक्षा व्यवस्था जागतिक दर्जाची होईल, यामुळे वापरकर्त्यांना अधिक सुरक्षित वाटेल.
- Google द्वारे एक प्रगत संरक्षण कार्यक्रम (APP) देखील आणला जाईल. -गुगलने इंटरनॅशनल फाउंडेशन फॉर द इलेक्टोरल सिस्टिम (IFES), यूएन वूमन आणि नॉनप्रॉफिट डिफेंडिंग डिजिटल कैंपेन (DDC) सोबत भागीदारी केली आहे.
कोण घेऊ शकेल गुगलच्या नवीन फीचरचा फायदा
- नवीन सायबर सिक्युरिटी फीचरमुळे मानवी हक्क कार्यकर्ते, पत्रकार, राजकारणी, जगभर काम करणारे अधिकारी यांच्यावरील सायबर हल्ले कमी होतील.
- गुगलचे नवीन सुरक्षा वैशिष्ट्य पुढील वर्षी म्हणजेच २०२२ च्या सुरुवातीस लाँच केले जाऊ शकते.