मुक्तपीठ टीम
गुगलने प्ले स्टोअरवर थर्ड-पार्टी कॉल रेकॉर्डिंग अॅप ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कारवाई ११ मेपासून सुरू होणार आहे. हे बदल प्रथम Reddit यूजर आणि नंतर 9to5Google द्वारे नोंदवले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन पॉलिसी अपडेटमुळे, डेव्हलपर्सद्वारे वापरल्या जाणार्या अॅंड्रॉईडच्या अॅक्सेसिब्लिटी एपीआयवर बंदी घालण्यात आली आहे. याद्वारे, डेव्हलपर्स त्यांच्या अॅपमध्ये रिमोट कॉल रेकॉर्डिंग इनेबल करायचे. आता हे करणे शक्य नाही कारण, गुगलने यावर बंदी घातली आहे.
गुगलच्या ‘या’ निर्णयाचा मोठमोठ्या अॅपवर परिणाम
- गुगलच्या या निर्णयाचा थेट परिणाम ट्रूकॉलर सारख्या अॅपवर होणार असून आता त्याद्वारे फोन कॉल्स रेकॉर्ड करता येणार नाहीत.
- जर तुमच्या फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगची सुविधा बाय डीफॉल्ट नसेल, तर ते थोडे कठीण होऊ शकते.
- यापूर्वी, गुगलने अॅंड्रॉईड ६ सह कॉल रेकॉर्डिंग बंद केले आहे. मग डेव्हलपर्सना अॅंड्रॉईड १० मध्ये व्हॉइस रेकॉर्डिंगसाठी मायक्रोफोन वापरण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले. तेव्हापासून, त्याने अॅक्सेसिब्लिटी एपीआयद्वारे कॉल रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली.
गुगलने म्हटले आहे की, “अॅक्सेसिब्लिटी एपीआय रिमोट कॉल ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी डिझाइन केलेले नाही.” कंपनीने असेही स्पष्ट केले की नवीन पॉलिसी केवळ प्ले स्टोअरवरील थर्ड-पार्टी अॅप्ससाठी आहे. कारण फोनमध्ये येणाऱ्या डायलर अॅप्सना कॉल रेकॉर्डिंगसाठी अॅक्सेसिब्लिटी एपीआयची गरज नसते. अॅंड्रॉईडसाठी लोकप्रिय कॉलर आयडी अॅप असलेल्या ट्रूकॉलरने घोषित केले आहे की, ते ११ मे रोजी विनामूल्य कॉल-रेकॉर्डिंग वैशिष्ट्य बंद करत आहे.
पाहा व्हिडीओ :