गुगलने कॅमेरा गो अॅपसाठी नवीन फीचर आणले आहेत. गुगलचे नवे कॅमेरा अॅप एंट्री-लेव्हल डिव्हाइससाठी आहे. मार्च २०२० मध्ये अँड्रॉइड गो एडिशन ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या हँडसेटसाठी हा अॅप सुरू करण्यात आला. अपडेटनंतर हा अॅप एचडीआर सपोर्टसह उपलब्ध आहे.
गुगल कॅमेरा गो अॅप हा गुगल कॅमेरा अॅपची एक टोन्ड-डाऊन आवृत्ती आहे. हा अँड्रॉइड गो एडीशन ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार्या हँडसेटसाठी आहे. अँड्रॉइडच्या ‘गो एडिशन’मुळे २ जीबी रॅम एंट्री-लेव्हल स्मार्टफोन वापरकर्त्यांना देखील नवीन सुविधेचा लाभ घेता येतील. कंपनीने ट्विट करून ही माहिती दिली आहे.
“कॅमेरा गोमध्ये सुधारणा केल्या आहेत. गुगल आता अधिक अँड्रॉइड डिव्हाइसवर एचडीआर फिचर उपलब्ध करत आहे, ज्यामुळे उच्च-गुणवत्तेचे फोटो काढता येतील. गुगलने ऑक्टोबरमध्ये गुगल कॅमेरा गो अॅपवर नाईट मोड लाँच केला. त्यामुळे अँड्रॉइड गो स्मार्टफोन वापरकर्त्यांना कमी-प्रकाशात आणि फ्लॅशविनाही उच्च-गुणवत्तेचे फोटो कॅप्चर करता येत आहेत.