मुक्तपीठ टीम
गुगल मीटच्या सर्व युजर्सकडे माइक आणि कॅमेरा नियंत्रण आहे. यामुळे अनेक वेळा चर्चेदरम्यान गडबड होत असे. पण आता असे होणार नाही कारण गुगल मीट घेउन आलाय एक नवीन फीचर अपडेट.
होस्टला कंपनीकडून कॅमेरा आणि मायक्रोफोन बंद करण्याचा पर्याय आता गुगल मीटने आणला आहे. अशा परिस्थितीत, मीटिंग दरम्यान होस्ट, मीटिंगच्या सर्व युजर्सचे कॅमेरा आणि मायक्रोफोन बंद करू शकतो.
आयओएस आणि अँड्रॉइड अॅप्ससाठी अपडेट्स येण्याची अपेक्षा
- सर्व युजर्सना म्यूट करण्याची सुविधा फक्त होस्टकडे असेल.
- हे वैशिष्ट्य केवळ डेस्कटॉप ब्राउझरसाठी उपलब्ध असेल.
- लवकरच हे फिचर आयओएस आणि अँड्रॉइड आधारित मोबाईल अॅप्ससाठी रिलीज होऊ शकते.
- गुगल सारखे फीचर मायक्रोसॉफ्ट टीम मध्ये आधीच दिले आहे.
- गुगल कडून गुगलच्या एज्युकेशन फंडामेंटल्स आणि एज्युकेशन प्लसच्या सर्व वर्कस्पेसच्या मीटिंग होस्टना अधिक नियंत्रणे दिली जात आहेत.
- उर्वरित गुगल वर्कस्पेसला येत्या काही दिवसांत या फिचर्सचे अपडेट मिळेल.
- मीटिंग होस्टला सर्व युजर्सचे मायक्रोफोन आणि कॅमेरा म्यूट करण्याचा अधिकार असेल.
- परंतु, युजर्स स्वतःला अनम्यूट करण्यास सक्षम असतील.
कॅमेरा आणि मायक्रोफोन फिचर्स बाय डीफॉल्ट म्युट केले जाईल
- गुगल मीटचे मायक्रोफोन आणि कॅमेरा फिचर्स बाय डीफॉल्ट लॉक केले जाईल.
- मीटिंग दरम्यान होस्ट ते चालू करण्यास सक्षम असेल.
- लाइव्ह स्पीच ट्रान्सलेशन कॅप्शन फीचर गुगल मीटमध्ये आणले आहे.
- ज्यांना बघण्यात त्रास होतो तसेच ज्या युजर्सना वाचण्यास त्रास होतो, त्या युजर्ससाठी अतिशय सोयीचे असेल हे फीचर.