मुक्तपीठ टीम
आपण हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवासाच्या इतर क्रियांचे मोजमाप करण्यासाठी स्मार्टवॉच किंवा स्मार्ट बँड वापरतो, परंतु लवकरच स्मार्टफोन वापरकर्त्यांना त्यांच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवास फोनच्या कॅमेरावरूनच कळू शकणाराय. हे फीचर लवकरच गुगल फिट अॅपवर उपलब्ध होईल. सुरुवातीला ते पिक्सेल फोनवर असेल. लवकरच इतर अँड्रॉइड फोनवरही या फिचरचा लाभ मिळेल.
गूगल हेल्थच्या आरोग्य तंत्रज्ञानाचे संचालक श्वेताक पाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात ही नवी फिचर उपलब्ध होऊ लागतील. यासाठी गूगल मायक्रोफोन, कॅमेरा आणि एक्सेलेरोमीटर यासाठी स्मार्टफोनमध्ये आधीपासून इनबिल्ट असलेले सेन्सर वापरेल.
गूगलचा मोबाइल डॉक्टर काम कसं करणार?
- स्मार्टफोनवरील आरोग्य तपासणीसाठी ज्याची तपासणी करायची, त्या व्यक्तीचे बोट कॅमेराच्या लेन्सवर ठेवावे लागेल.
- यानंतर कॅमेरा रक्त पंप केल्यामुळे त्वचेचा रंग किती वेगात बदलतो हे तपासेल.
- अशा परिस्थितीत, तो सर्व डेटा गोळा करेल त्यानंतर ते हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवास सांगेल.
- प्रायव्हसी लक्षात घेऊन कंपनीने असे म्हटले आहे की, हा डेटा गुगलच्या डेटा सेंटरमध्ये खात्यात ठेवला जाईल, जो इतर कोणीही पाहू शकणार नाही.
- श्वासोच्छवास तपासताना हे फिचर छाती किती फुलते यावर देखील लक्ष देईल.
- कॅमेर्यासमोर उभी असलेली व्यक्ती श्वास घेते तेव्हा छाती फुलते आणि जेव्हा ते बाहेर जातात तेव्हा ती किती आत जाते, या डेटाचे ती विश्लेषण करेल आणि वापरकर्त्यास माहिती देईल.
- ही वैशिष्ट्ये किती अचूकपणे कार्य करतील हे ती लॅान्च झाल्यानंतरच कळेल.
पाहा व्हिडीओ: