मुक्तपीठ टीम
गुगल हा एका लोकप्रिय सर्च इंजिंन आहे. गुगल हे एक असे व्यासपीठ आहे ज्यात आपण कोणत्याही गोष्टीची माहिती सहजरित्या मिळवण्यासाठी वापर करतो. सर्वाना विश्वास आहे की, गुगलवर मिळालेली प्रत्येक माहिती १०० टक्के अचूक असते. परंतु हाच तो गुगल आहे, जो प्रत्येक क्षणी आपल्या स्मार्टफोनवर लक्ष ठेऊन असतो. आपण कुठे जातो किंवा आपण काय शोधत आहोत यासंबंधित ही माहिती गुगला असते. वास्तविक, गुगल हे व्यासपीठ आपली सेवा अधिक सुधारित करण्यासाठी वापरकर्त्यांच्या डेटाचा वापर करत असतो. मात्र, गुगल मॅप, सर्ज इंजिन आणि हवामान लोकेशनच्या माध्यमातून गुगल आपले लोकेशन ट्रेस करत असते. गुगलने आपले लोकेशन ट्रेस करु नये असे वाटत असल्यास त्यासाठी काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.
लोकेशन ट्रॅकिंग असे बंद करा
लोकेशन ट्रॅकिंग बंद करण्यासाठी दोन पर्याय आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या स्मार्टफोनमधील सर्व अॅप्सचे लोकेशन डेटाची परवानगी ब्लॉक केले जावे.
परवानगी ब्लॉक करण्याचा पहिला पर्याय
- वापरकर्त्यांना सर्वप्रथम अँड्रॉईड स्मार्टफोनच्या सेटींग्जवर जावे लागेल.
- यानंतर, आपल्याला लोकेशन डेटावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर परमिशन टॅब डावीकडे स्वाइप करून लोकेशन बंद केले जाऊ शकते.
परवानगी ब्लॉक करणे दुसरा पर्याय
- गुगल अकाउंटच्या लोकेशन हिस्ट्री फीचरला बंद केल्यानेही लोकेशन ट्रॅकिंग बंद केले जाऊ शकते.
- गुगल अकाउंटच्या सेटींग्स ऑप्शनवर क्लिक करावे.
- यानंतर, मॅनेज युअर गुगल अकाउंट यावर क्लिक करावे.
- नंतर, गुगल अकाउंटच्या प्रायव्हसी आणि पर्सनलाइजेशन वर क्लिक करा.
- अॅक्टिव्हिटी कंट्रोल विभागाच्या लोकेशन हिस्ट्रीवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर, डावीकडे स्वाइप करून लोकेशन हिस्ट्री बंद केलं जाऊ शकते.
- यासर्व गोष्टी लक्षात घेऊन गुगलकडून आपल्या लोकेशनवर ठेवली जाणारी नजर आपण कायमची बंद करु शकतो.