मुक्तपीठ टीम
महिला दिनापूर्वी गुगल इंडियाच्या विद्यार्थिनींसाठी एक मोठी संधी समोर आली आहे. याअंतर्गत गुगलच्या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनींना कंपनीत नोकरीची संधी आणि रोख बक्षीस मिळणार आहे. गुगल इंडियातर्फे वुमन कोडर्स-गर्ल हॅकाथॉन स्पर्धा विद्यार्थिनींसाठी आयोजित करत आहे. त्याअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बिल्ड युवर फ्युचर विथ गुगल या थीमवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गर्ल हॅकाथॉनसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थिनींना ०९ मार्च २०२२ पर्यंत buildyourfuture.withgoogle.com च्या माध्यमातून गर्ल हॅकाथॉनच्या अधिकृत वेबसाइटवर आपली नोंदणी करू शकतात. तसेच, ही स्पर्धा केवळ कॉम्प्युटर सायन्स आणि आयटी विषयातील पदवीपूर्व आणि पदव्युत्तर इंजिनीअरिंग पदवी कार्यक्रमात नोंदणी केलेल्या विद्यार्थिनींसाठी आहे. ही स्पर्धा १९ मार्च ते ३० एप्रिल २०२२ या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यात आयोजित केली जाईल.
नोकरीसह रोख बक्षीस जिंकण्याची उत्तम संधी
- गुगल इंडियाच्या मते, गर्ल हॅकाथॉन भारतीय विद्यार्थिनींना त्यांचे कोडिंग कौशल्य एक टीम म्हणून दाखवण्याची आणि रीअल-टाइम तांत्रिक आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्जनशील उपायांवर काम करण्याची संधी देईल.
- ही स्पर्धा फक्त विद्यार्थिनींपुरती मर्यादित असून त्यात सहभागी होण्यासाठी त्यांना स्वतःचा तीन सदस्यीय संघ तयार करावा लागेल.
- विजेत्या संघांना गुगलवर नोकरीसाठीच्या इंटरव्ह्यूची संधी आणि रोख बक्षिस जिंकण्याची संधी देखील मिळेल.
- ही स्पर्धा तीन टप्प्यात होणार असून सहा आठवडे चालणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- ग्रुप ए- कॉम्प्युटर सायन्स आणि संबंधित शाखेतील २०२४ आणि २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या बॅचच्या पदवीधर, पदव्युत्तर, इंटीग्रेटेड ड्यूल डिग्री आणि संबंधित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी
- ग्रुप बी- कॉम्प्युटर सायन्स आणि संबंधित शाखेतील २०२४ आणि २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या बॅचच्या पदवीधर, पदव्युत्तर, इंटीग्रेटेड ड्यूल डिग्री आणि संबंधित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी
गुगल इंडियाच्या गर्ल हॅकाथॉन स्पर्धेची तीन टप्प्यातील रचना
- पहिला टप्पा- गुगल ऑनलाइन चॅलेंज
- दुसरा टप्पा- डिझाइन डॉक्यूमेंट राउंड
- तिसरा टप्पा- व्हर्च्युअल हॅकाथॉन
गर्ल हॅकाथॉन स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया
- गर्ल हॅकाथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी संघांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.
- यासाठी तीन सदस्यांच्या टीममधून टीम लीडरची निवड करावी लागेल.
- त्यानंतर संघाची नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी करण्यासाठी, buildyourfuture.withgoogle.com वर जा.
- संघाला एकापेक्षा जास्त वेळा नोंदणी करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- सर्व सहभागींना त्यांचे ई-मेल आयडी शेअर करावे लागतील.
- हॅकाथॉन संदर्भात कोणत्याही प्रश्नासाठी किंवा प्रश्नासाठी, girlhackathon-india@google.com वर संपर्क साधू शकता.
- सहभागी फक्त भारतीय विद्यार्थिनी असणे आवश्यक आहे.
- या हॅकाथॉनमध्ये परदेशी विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची परवानगी नाही.
- कोणताही विद्यार्थी एकापेक्षा जास्त संघाचा सदस्य होऊ शकत नाही.
- हॅकाथॉनच्या कालावधीत टीम लीडर बदलता येत नाही.
पाहा व्हिडीओ: