मुक्तपीठ टीम
मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यासाठी कृषी आणि पाणी व्यवस्थापनासाठी निती आयोगाने ३ कोटी रुपायांचा निधी जाहीर केला आहे. निती अयोगचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, “गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कामगिरीच्या आधारावर उस्मानाबाद जिल्ह्याने वरचा दर्जा पटकावला आहे. अॅस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्रामअंतर्गत वेगवगळी आव्हानं दिली जातात. त्यात दर्जा मिळविणाऱ्या जिल्ह्यांना निती आयोग अतिरिक्त निधी प्रदान करतो.
उस्मानाबादप्रमाणेच गडचिरोली आणि वाशिम हे जिल्हेही तीन कोटींचा निधी मिळविण्यासाठी पात्र आहेत असे सांगण्यात आले आहे. काहीशा मागे असलेल्या जिल्ह्यांमध्ये वेगानं आणि प्रभावीपणे बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जातो.
पाहा व्हिडीओ: