मुक्तपीठ टीम
जगभरातील ५३% कंपन्या यावर्षी कर्मचारी वाढवणार आहेत. त्यातही सर्वाधिक कंपन्या या टेक्नोलॉजी सेक्टरमधील आहे. टेककंपन्या १४ टक्के नव्या प्रतिभेला वाव देतील. ईकॉमर्स, बांधकाम कंपन्यांही दहा टक्क्यांपेक्षा जास्त मनुष्यबळ वाढवतील.
कोरोना महामारीतून आता अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे मानले जाते. अर्थव्यवस्था सावरत असताना कामासाठी मनुष्यबळ लागणार आहे. त्यामुळे कंपन्या भरतीचे प्रमाण वाढवण्याची नवीन योजना देखील आखत आहेत. एका अहवालामुसार, ५३% भारतीय कंपन्या कर्मचारी वाढविण्याच्या विचारात आहेत. २०२० मध्ये नोकरीत १८% घट झाली होती. टेक्नोलॉजी कंपन्यांमध्ये सर्वाधिक भरतीची अपेक्षा आहे. सर्वेक्षण केलेल्या ७४% टेक कंपन्यांनी सांगितले की, ते कर्मचारी वाढवतील. त्यात सरासरी १४% वाढ अपेक्षित आहे. ६८% ई-कॉमर्स कंपन्यांपैकी कर्मचारी संख्या १२% ने वाढवतील. त्याचप्रमाणे, ४४% बांधकाम कंपन्यांचे लक्ष्य १०% अधिक कर्मचाऱ्यांचे आहे.
अॅप्लिकेशन इंजीनिअर, चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर मागणी सर्वाधिक असेल. व्हर्च्युअल गेमिंगमध्ये ऑग्मेंटेड रिएलिटी आणि मिक्स्ड रिअॅलिटीचा वापर वाढविण्यास आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंगमध्ये तज्ञ असलेल्या व्यावसायिकांना प्राधान्य मिळेल.
अहवालानुसार ६०% कंपन्या वेतनात वाढ करण्याचा विचार करीत आहेत, तर ५५% बोनस देण्यास तयार आहेत. यापैकी ४३% कंपन्या एका महिन्याच्या पगारापेक्षा जास्त बोनस देतील. आरोग्य सेवा क्षेत्राला सरासरी ८% सर्वाधिक वाढ मिळण्याची अपेक्षा आहे. एफएमसीजीमध्ये ७.६% आणि ई-कॉमर्स / इंटरनेट सेवा क्षेत्रात ७.५% वाढ असेल.
कोरोना महामारीच्या वेळी ज्या कंपन्यांना आपले काम बंद करावे लागले होते त्या कंपन्या परत कार्यरत होत आहेत. त्या मोठ्या प्रमाणात भरती करत आहेत.
पाहा व्हिडीओ: