Thursday, May 15, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मंदिरांमध्ये पडून असलेले २ हजार १३७ किलो सोने तामिळनाडू सरकार बँकेत ठेवणार, व्याजाचे शेकडो कोटी मंदिर विकासासाठी वापरणार!

October 25, 2021
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
tamil nadu

मुक्तपीठ टीम

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या द्रमुक सरकारने राज्यातील मंदिरांमध्ये पडून असलेले सोने मंदिरांच्या विकासासाठी वापरण्याची योजना आणली आहे. सध्या हे सोने मंदिरांमध्ये फक्त पडून आहे. ते वितळवून २४ कॅरेट सोन्याचे बार बनवले जातील. आतापर्यंत मंदिरांमध्ये ठेवलेले ५०० किलो सोने वितळवून बँकांमध्ये जमा केले आहे आणि त्यामुळे राज्य सरकारला ११ कोटी रुपयांचे व्याज मिळाले आहे. यानंतर सरकारने २ हजार १३७ किलो सोने वितळवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

मंदिरांच्या ताब्यातील हे सोने कशासाठीही वापरले जात नाही. या योजनेंतर्गत, थिरुवरकाडू येथील श्री कुमारीअम्मन मंदिर, समयापुरम येथील मरिअम्मन मंदिर आणि एरुक्कनकुडी येथील मरिअम्मन मंदिराचे सोने प्रथम वितळले जाईल. सोने वितळल्यानंतर ते बार बनवून राष्ट्रीय बँकांमध्ये जमा केले जाईल आणि मिळणारे व्याज ‘स्टेट हिंदू चॅरिटेबल अँड रिलीजियस एन्डोमेंट्स’ विभागाकडून मंदिरांच्या विकासासाठी वापरला जाईल.

 

सरकार म्हणते की, ते फक्त भक्तांनी दान केलेले सोन्याचे दागिने वितळवतील, जे गेल्या १० वर्षांपासून वापरले जात नाहीत. ज्या अलंकारांचा वापर देवतांच्या शोभेसाठी केला जातो त्यांना हातही लावला जाणार नाही. सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया पारदर्शक नसल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

 

सरकारद्वारे सोने वितळवण्याविषयीची विशेष माहिती

  • सध्या केवळ नऊ प्रमुख मंदिरांमध्ये दान केलेले सोने वितळले जाते.
  • ५०० किलो सोन्यातून व्याज म्हणून सरकारला ११ कोटी रुपये मिळाले.
  • ३८,००० मंदिरांमध्ये ठेवलेले सोने आता वितळणार आहे.
  • सोन्याचे मूल्य १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

 

तामिळनाडूमध्ये ४२ वर्षांपासून प्रयत्न सुरू

  • तामिळनाडू सरकारने म्हटले आहे की, मंदिरांमधील सोने ‘मोनेटाइज’ करण्याची योजना १९७९ मध्येच आली.
  • या अंतर्गत, भक्तांनी दान केलेले सोने नऊ प्रमुख मंदिरांमध्ये वितळले जाते, ज्यात मदुराईतील प्राचीन मीनाक्षी सुंदरीश्वर मंदिर, पलानीमधील धनधायथापनी मंदिर, तिरुचेंदूरमधील श्री सुब्रमण्य स्वामी मंदिर आणि समपुरममधील मरीअम्मम मंदिर यांचा समावेश आहे.
  • या कारवाईविरोधात दाखल केलेल्या याचिकांमध्ये हे दागिने मंदिरांचे असून भक्तांनी ते दान केले आहेत, त्यामुळे त्यांना हात लावण्याचा सरकारला अधिकार नसल्याचे म्हटले आहे.

 


Tags: Chief Minister MK Stalindevelopment of templesGoldmuktpeethTamil Naduतामिळनाडूतामिळनाडू सरकारमुख्यमंत्री एमके स्टॅलिन
Previous Post

शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना

Next Post

बेळगावात कचरा मुक्तीसाठी अभिनव प्रयोग, अंडरग्रांऊंड कचरा कंटेनर! आपल्या शहरातही पाहिजेच!!

Next Post
Underground waste containers

बेळगावात कचरा मुक्तीसाठी अभिनव प्रयोग, अंडरग्रांऊंड कचरा कंटेनर! आपल्या शहरातही पाहिजेच!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!