मुक्तपीठ टीम
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानाच्या शौचालयातील आरशामागे सव्वा कोटी रुपयांचे सोने सापडले आहे. हवाई गुप्तहेर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत हे सोने जप्त करण्यात आले. अधिकाऱ्यांनी एतिहाद विमान क्र. ई वाय -206 या विमानाची झडती घेतली, तेव्हा ही सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली.
जप्त केलेले सोने पुढील प्रमाणे आहे:
- 24,57,792 रुपये मूल्याची प्रत्येकी 582 ग्राम वजनाची २४ कॅरेट सोन्याची दहा तोळ्याची पाच बिस्किटे
- 99,24,073 रुपये किंमतीचे 2554 ग्राम असलेले आणि 2350 ग्राम निव्वळ वजनाचे सोने
- अंदाजित एकूण अंदाजित 1,23,81,865 रुपयांचे सोने
हे सोने विमानाच्या शौचालयात आरशाच्या मागे असलेल्या पत्र्यामागे हे सोने लपविण्यात आले होते . सीमाशुल्क न भरता भारतात तस्करी करून आणल्याची खात्री पटल्यानंतर हे सोने जप्त करण्यात आले.
या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.