मुक्तपीठ टीम
गोकुळष्टमीचा सण म्हणजे उत्साहाला उधाण. पण कोरोनामुळे खूपच बंधनं. त्यावर मात करत गोकुळाष्टमी ऑनलाईन साजरी करायची शक्कल काही शाळांनी लढवलीय. शाळा बंद पण शिक्षण सुरु आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे शाळा ऑनलाइन सुरु आहेत. सोलापूरच्या लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळेनं असाच उपक्रम राबवला.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही कार्यक्रम साजरा झाला. “कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम” ऑनलाइन घेण्यात आला, त्यामुळे मुलांना खूप आनंद झाला. मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला आणि मुलांना आणखी प्रोत्साहन मिळाले. या कार्यक्रमात मृणाल नीरज महामुरे (३री) आणि स्वरा नीरज महामुरे (१ली) या मुलींनी नृत्य सादर केले. सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून वैशाली मेलगिरी मॅडम, कोरे मॅडम, पतंगे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यार्थ्यांचे पालक आई, बाबा आणि आजी यांनीही मुलांची तयारी करुन घेतली. त्यांनी व्यवस्थित व्हिडीओ रेकॉर्ड करून शाळेच्या उपक्रमात ऑनलाइन सहभाग नोंदवला.