मुक्तपीठ टीम
भारताच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गोदरेज समूहाने एक व्हिडिओ कॅम्पेन लाँच केले असून ते भारताच्या प्रगतीला सलाम करणारे तसेच गेल्या १२३ वर्षांपासून समूह ज्या भारत व भारतीयांची सेवा करत आहे, त्यांच्या एकीशी असलेले भावनिक नाते साजरे करणारे आहे. त्याचप्रमाणे #गोदरेजफॉरइंडिया हे कॅम्पेन समूहाने देशाच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे आहे.
या कॅम्पेनमधे समूहाचा गेल्या कित्येक दशकांपूर्वी कुलुपांपासून सुरू झालेला प्रवास आणि एकूण स्थित्यंतर टिपण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जनहितासाठी, भारताच्या विकासासाठी हाती घेण्यात आलेल्या असंख्य उपक्रमांचा, त्यासाठी देशाशी केलेली भागिदारी या कॅम्पेनमधे पाहायला मिळते. ही फिल्म प्रजासत्ताक दिनी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि लिंक्डइनवर प्रसारित करण्यात आली.
या डिजिटल फिल्ममध्ये गोदरेज समूहाने गेल्या कित्येक दशकांत भारताची सुरक्षा, आराम, वैयक्तिक सुरक्षा आणि स्वास्थ्य, आरोग्यसेवा, काम- आराम देणारी उत्पादने, फर्निचर, संरक्ष उत्पादनांच्या माध्यमातून भारताच्या कोरोना योद्ध्यांची सुरक्षा आणि नुकतेच देशभरात सुरक्षित पद्धतीने करण्यात आलेले रेफ्रिजरेटेड कोव्हिड लसींचे वितरण यांची झलक पाहायला मिळणार आहे. त्याशिवाय गोदरेजने भारताच्या उर्जा व अवकाश मोहिमांमध्ये घेतलेला सहभाग, पर्यावरण व एकंदर निसर्ग यंत्रणेविषयी समूहाची बांधिलकी आणि असं बरंच काही पाहायला मिळणार आहे.
गोदरेज समूहाच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य ब्रँड अधिकारी तान्या दुबाश म्हणाल्या, ‘या देशाच्या विकास गाथेचा एक भाग असल्याचा आणि आपल्या नाविन्यपूर्ण उत्पादनांद्वारे या विकासात योगदान देण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. देशाचे हित आणि महत्त्व यांसाठी योग्य उत्पादने पुरवण्याचा आमचा प्रवास, आमचा विश्वास, मूल्ये आणि प्रयत्न #गोदरेजऑफइंडिया कॅम्पेनमधे दाखवण्यात आला आहे. या कॅम्पेनमधून आमची भारताप्रती असलेली बांधिलकी, देशासाठी सर्वोत्तम ते देण्यासाठी, सातत्याने स्थित्यंतर करण्यासाठीचे प्रयत्न दिसून येतील.’
क्रिएटिव्हलँड एशियाच्या मुख्य क्रिएटिव्ह अधिकारी अनू जोसेफ म्हणाल्या, ‘गोदरेज कायमच भारताच्या विकासगाथेचा महत्त्वाचा भाग राहिली आहे. अवकाश मोहिमांपासून, शेतकऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यापासून देशाचे संरक्षण करण्यापर्यंत समूहाने विविध व्यवसायांनी सातत्याने भारताच्या आकांक्षांशी सुसंगत राहाण्यावर भर दिला आहे. ही फिल्म भारताच्या ७२ व्या रिपब्लिक दिनी त्याचीच आठवण करून देणारी आहे.’
या फिल्मची संकल्पना गोदरेजची टीम आणि क्रिएटीव्ह एशिया यांची आहे.
आपल्या सर्वांना माहीत आहे, की गोदरेज हा सर्वात विश्वासार्ह ब्रँड आहे आणि त्यांच्या दैनंदिन कामाचा लेखाजोखा आम्हाला नोंदवून ठेवायचा होता. एक दिवस गोदरेज आम्हाला पोश्चरसाठी योग्य फर्निचर पुरवून मदत करते, तर दुसऱ्या दिवशी अवकाश मोहिमांच्या माध्यमातून देशाची मदत केली जाते. कधी गोदरेज शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देण्यासाठी मदत करते, तर कधी आपल्या घरांचे कीटाणू व विषाणूंपासून संरक्षण करते. दर दिवशी गोदरेज नवी भूमिका स्वीकारत आपल्या सतत बदलणाऱ्या गरजा पूर्ण करते आणि राष्ट्राच्या विकासासाठी हातभार लावते.
व्हिडीओची युट्यूब लिंक:
https://www.youtube.com/watchv=Ol6qX8DjlgI&feature=youtu.be
गोदरेज समूहाबद्दल
१८९७ मध्ये स्थापन झालेल्या या समूहाची Godrej Group मुळे भारताच्या स्वातंत्र्य आणि स्वदेशी चळवळीत रूजलेली आहेत. वकीली क्षेत्र सोडन उद्योजक बनलेल्या अर्देशीर गोदरेज यांना काही व्यवसायांत अपयश आले, मात्र नंतर कुलुपांच्या व्यवसायात त्यांनी जबरदस्त यश मिळवले. आज आमचे जगभरात ग्राहकोपयोगी वस्तू, स्थावर मालमत्ता, उपकरणे, शेती आणि अशा इतर व्यवसायांचे १.१५ अब्ज ग्राहक आहेत. किंबहुना आमचे भौगोलिक अस्तित्व पृथ्वीच्या पलीकडे पोहोचले आहे, कारण आम्ही बनवलेली इंजिन्स भारताच्या अवकाश मोहिमांसाठी वापरली जात आहेत.
५ अब्ज डॉलर्सच्या उत्पन्नासह आम्ही वेगाने विकास करत असून आमच्या महत्त्वाकांक्षा खूप मोठ्या आहेत. आमच्यासाठी दमदार आर्थिक कामगिरी आणि नाविन्यपूर्ण, लोकप्रिय उत्पादनांसह एक चांगली कंपनी असणे फार महत्त्वाचे आहे. गोदरेज समूहातील २३ टक्के प्रमोटर होल्डिंग ट्रस्टमध्ये असून ते पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करतात. आम्ही ‘शेयर्ड व्हॅल्यू’च्या गुड अँड ग्रीन धोरणासह आमचा ध्यास आणि उद्देश एकत्र आणून त्याद्वारे सर्वसमावेशक व हरित भारत उभारण्याचाच मानस आहे. या सर्वांच्या केंद्रस्थानी आमचे लोक आहेत. आम्ही काम करण्यासाठी प्रेरणादायी जागा, उच्च कामगिरी करण्यास चालना देणारी संस्कृती तयार केली असून त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्याशिवाय आम्ही आमच्या टीममधील वैविध्यत जपण्यासाठीही बांधील आहोत.