वैविध्यपूर्ण कृषी व्यवसाय करणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेड’ने भारतीय बाजारपेठेत ‘‘ग्रेशिया’’ (फ्लक्सामेटामाइड, आयसोक्साझोलईनचे संयुग) सादर करीत असल्याची करण्याची घोषणा केली. जपानच्या ‘निसान केमिकल कॉर्पोरेशन’ने शोधलेले आणि विकसित केलेले हे पेटंट रसायन आहे. ‘गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेड’च्या सहकार्याने ते भारतात सादर केले जाणार आहे.
गोदरेज अॅग्रोव्हेटचा दावा
‘ग्रेशिया’ हे अतिशय नाविन्यपूर्ण आणि पेटंटेड केमिस्ट्री असलेले जागतिक दर्जाचे, व्यापक उपयोगमूल्य असलेले उत्पादन आहे. यामध्ये पूर्वलक्षी स्वरुपाची संरक्षणाची शक्ती समाविष्ट आहे.
- विविध प्रकारची कडधान्ये, मिरची, कोबीवर्गीय पिके, टोमॅटो, वांगी व भेंडी यांचे उत्पादन घेण्यार्या
- शेतांमध्ये अळ्या, सुरवंट व फुलकिडे यांसारख्या चघळणार्या आणि शोषणार्या कीटकांवर ‘‘ग्रेशिया’’मुळे उत्कृष्ट नियंत्रण मिळवता येते.
- हे कीटकनाशक कीटकांच्या मज्जासंस्थेतील ‘जीएबीए गेटेड क्लोराईड चॅनेल’ला नियामकरित्या प्रतिबंधित करते.
- ‘‘ग्रेशिया’’चा उपयोग केल्यानंतर काही तासांतच कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊन अपस्मारासारख्या झटक्यामुळे ते मरतात.
- ‘‘ग्रेशिया’’मध्ये परिणाम घडवण्याची एक नवीन पद्धत आहे.
- बाजारात विद्यमान कीटकनाशकांना न जुमानणारे कीटकदेखील ‘‘ग्रेशिया’’मुळे नियंत्रित होऊ शकतात. अर्थात, सस्तन प्राणी आणि उपयोगमूल्य असलेल्या कीटकांच्या बाबतीत ‘ग्रेशिया’मध्ये उत्कृष्ट स्वरुपाचे सुरक्षा गुणधर्म आहेत.
योग्य वेळी उपयोग केल्यास, ‘ग्रेशिया’चा प्रभाव जास्त काळ टिकतो व कीटक नियंत्रणाचा परिणाम अधिक प्रमाणात मिळतो. ‘ग्रेशिया’ पिकांवर साचून राहात असल्याने ते पाण्याने वाहून जात नाही. त्यामुळे पावसापाण्यातही त्याचा प्रभाव चांगला पडतो. सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या विविध प्रकारच्या उपायांपेक्षा ‘ग्रेशिया’ हा परवडणारा आणि परिणामकारक उपाय आहे. शेती स्तरावर ‘ग्रेशिया’ वापरण्याची किंमत प्रति एकर १८०० रु. इतकी कमी असेल.
गोदरेजला मोठ्या बाजारपेठेची अपेक्षा
‘गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक बलराम सिंग यादव म्हणाले, “शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आमच्या कटिबद्धतेचा एक भाग म्हणून आम्ही नेहमीच भारतीय बाजारपेठा आणि शेतकऱ्यांसाठी अनुकूल असे उपाय सादर केले आहेत. ‘हनाबी’नंतर, ‘ग्रेशिया’ हे ‘निसान केमिकल्स’चे दुसरे उत्पादन आहे, जे आम्ही देशात सादर करीत आहोत. पीक संरक्षणासाठीच्या उत्पादनांची भारतातील बाजारपेठ अंदाजे २५ हजार कोटी रुपयांची आहे. यामध्ये कीटकनाशकांचा वाटा ३९ टक्के इतका आहे. ‘ग्रेशिया’ सादर केल्याने आम्हाला या विशिष्ट उप-विभागात व्यवसायवाढ करता येईल आणि त्यातून अंदाजे १५०० कोटी रुपयांची संधी बाजारात उपलब्ध होईल.”
‘गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेड’चे पीक संरक्षण व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश डोगरा म्हणाले, “निसान केमिकल्स’चे ‘हनाबी माईटीसाईड’ हे उत्पादन आम्ही २०१९मध्ये देशात सादर केले. ‘हनाबी’ला भारतातील माईटीसाईड्सच्या बाजारपेठेत आश्चर्यकारक परिणाम करणारे नवीन रसायन म्हणून ओळखले जाते. ‘ग्रेशिया’ हे एक जलद कृती करणारे, व्यापक परिणाम साधणारे कीटकनाशक आहे. भारतीय पीक संरक्षण बाजारपेठेतील आमचे नेतृत्व मजबूत करण्यात ते आम्हाला मदत करेल.”
‘निसान केमिकल कॉर्पोरेशन (इंडिया)’ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राज कुमार यादव म्हणाले, “शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोहिमेत भारतातील सर्वात मोठ्या कृषी रसायन व्यवसायांपैकी एक असलेल्या ‘गोदरेज अॅग्रोव्हेट’सोबत सहयोग आणि काम करण्याची ही खरोखरच एक उत्तम संधी आहे. ‘ग्रेशिया’च्या सादरीकरणाच्या निमित्ताने ‘गोदरेज अॅग्रोव्हेट’सोबतच्या आमच्या सहकार्याला एक दशक पूर्ण झाले आहे. आम्हाला खात्री आहे की हनाबीप्रमाणे, ‘ग्रेशिया’लादेखील बाजारात मोठ्या प्रमाणावर स्वीकृती मिळेल.”
About Godrej Agrovet Limited
Godrej Agrovet Limited (GAVL) is a diversified, Research & Development focused agri-business Company, dedicated to improving the productivity of Indian farmers by innovating products and services that sustainably increase crop and livestock yields. GAVL holds leading market positions in the different businesses in which it operates – Animal Feed, Crop Protection, Oil Palm, Dairy and Poultry and Processed Foods.
GAVL has a pan India presence with sales of over a million tons annually of high-quality animal feed and cutting- edge nutrition products for cattle, poultry, aqua feed and specialty feed. Our teams have worked closely with Indian farmers to develop large Oil Palm Plantations which is helping in bridging the demand and supply gap of edible oil in India. In the crop protection segment, the company meets the niche requirement of farmers through innovative agrochemical offerings. GAVL through its subsidiary Astec Life Sciences Limited, is also a business-to-business (B2B) focused bulk manufacturer of fungicides & herbicides. In Dairy and Poultry and Processed Foods, the company operates through its subsidiaries Creamline Dairy Products Limited and Godrej Tyson Foods Limited. Apart from this, GAVL also has a joint venture with the ACI group of Bangladesh for animal feed business in Bangladesh.
For more information on the Company, please log on to www.godrejagrovet.com.
Contact:
Supreeth Sudhakaran
9920584295
supreeth.sudhakaran@godrejinds.com