Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चिरंजीवीने मांडलं सुख आणि दु:खही…दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला नाकारणं अनुभवलं, आता मुलानं हिंदीतही दक्षिणेला गाजवलं!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, मस्तच
0
God Father Movie

मुक्तपीठ टीम

चिरंजीवीच्या ‘गॉड फादर’ या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर मुंबईत लाँच करण्यात आला. यावेळी चिरंजीवी आणि सलमान खानमध्ये खास बॉन्डिंग पाहायला मिळाले. ट्रेलर लाँचिंगच्या वेळी चिरंजीवीने एका जुन्या घटनेचा संदर्भ देत सांगितले की, एका कार्यक्रमादरम्यान हिंदी सिनेमाला भारतीय सिनेमाचा दर्जा देण्यात आल्याने त्यांना अपमानास्पद वाटले. हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी होण्याचे त्यांचे स्वप्न त्यांचा मुलगा राम चरण याने पूर्ण केल्याचे चिरंजीवी सांगतात. ते म्हणतात, प्रत्येक चित्रपट हा ‘प्रादेशिक भाषेऐवजी भारतीय चित्रपट म्हणून ओळखला जावा, अशी त्यांची इच्छा आहे. हे काम एसएस राजामौली यांनी ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’मध्ये केले.

एका जुन्या घटनेचा संदर्भ देत चिरंजीवी म्हणाले, “माझ्या ‘रुद्रवीणा’ चित्रपटाला १९८९ मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रतिष्ठित ‘नर्गिस दत्त पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. या वेळी मला एका भिंतीवर भारतीय चित्रपटाचा इतिहास दर्शविणारी चित्रे दिसली. दक्षिण भारतीय अभिनेत्यांमध्ये फक्त जयललिता, एमजीआर आणि प्रेम नझीर यांचा फोटो होता. हे पाहून मला खूप वाईट वाटलं, हा माझ्या अपमानाप्रमाणेच होता. त्यांनी फक्त हिंदी सिनेमा भारतीय सिनेमा म्हणून दाखवला.

हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी होण्याचे स्वप्न मुलाने पूर्ण केले!- चिरंजीवी

  • चिरंजीवीला जे ‘स्टारडम आणि यश’ साऊथच्या चित्रपटांमध्ये मिळालं, तितकं यश हिंदी चित्रपटात मिळालं नाही.
  • त्यांचा मुलगा रामचरण याचा ‘आरआरआर’ हा चित्रपट तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड तसेच हिंदी भाषेत प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
  • मात्र, याआधी ‘जंजीर’च्या हिंदी रिमेकमध्येही रामचरण फ्लॉप झाला होता.
  • चिरंजीवी म्हणतात, ‘हिंदी चित्रपटसृष्टीत यश मिळवण्याचे माझे स्वप्न माझ्या मुलाने पूर्ण केले.’
  • चिरंजीवीने १९९०मध्ये ‘प्रतिबंध’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी १९९४ मध्ये आलेल्या ‘जंटलमेन’ चित्रपटातही काम केले होते.

प्रत्येक चित्रपट हा प्रादेशिक भाषेऐवजी, भारतीय चित्रपट म्हणून ओळखवा

  • चिरंजीवी म्हणतात, “बॉलिवुड किंवा टॉलीवूडमध्ये कोणताही विभक्त न होता सिनेमा हा भारतीय सिनेमा म्हणून जगभरात ओळखला जावा अशी माझी इच्छा आहे.
  • १५० हून अधिक चित्रपट केल्यानंतरही मला ‘गॉड फादर’मध्ये काम करताना पूर्वीसारखाच आनंद आणि ऊर्जा जाणवत होती.
  • प्रादेशिक किंवा हिंदी चित्रपट नसून भारतीय चित्रपट असावा अशी माझी नेहमीच इच्छा होती.

Tags: ChiranjeeviGod Father Moviegood newsHindi TrailermuktpeethRam Charanगॉड फादर चित्रपटचांगली बातमीचिरंजीवीमुक्तपीठराम चरणहिंदी ट्रेलर
Previous Post

चाणक्यांचंच आता सिंहासनाचं लक्ष्य: प्रशांत किशोर यांची बिहारात परिवर्तन यात्रा!

Next Post

इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यात चेंगराचेंगरी, खेळाडूंवर हल्ला तर, १२९ लोकांचा मृत्यू!

Next Post
Indonesia Football Match

इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यात चेंगराचेंगरी, खेळाडूंवर हल्ला तर, १२९ लोकांचा मृत्यू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!