Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बलात्कार प्रकरणात तरुण तेजपालांची सुटका, गोवा सरकार उच्च न्यायालयात जाणार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
tarun (1)

मुक्तपीठ टीम

२०१३ मधील लैंगिक अत्याचार प्रकरणात तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांना गोव्यातील सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. गोवा सरकार आता सत्र न्यायालयाच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. तरुण तेजपाल यांच्यावर एका सहकारी महिलेनं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. सात वर्षांनंतर गोवा सत्र न्यायालयाने त्यांना दिलासा देत त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे..

सतत लांबत होती सुनावणी

  • सुनावणीच्या तारखा सतत पुढे ढकलण्यात येत होत्या.
  • खटला लांबत असल्याने तरुण तेजपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
  • गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने खटला पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदत दिली होती.
  • २७ एप्रिल रोजी न्यायालय निकाल जाहीर करणार होते.
  • न्यायाधीशांनी या प्रकरणावरील निर्णयाला १२ मेपर्यंत पुढे ढकलले होते.
  • १२ मे रोजी पुन्हा हा निर्णय १९ मेपर्यंत पुढे ढकलण्यात आला
  • त्यानंतर १९ मे रोजी ते २१ मेची तारीख ठरवण्यात आली.

 

काय होते प्रकरण?

  • कनिष्ठ सहकारी महिलेने तरुण तेजपाल यांनी दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली होती.
  • गोवा पोलिसांनी नोव्हेंबर २०१३ मध्ये तरुण तेजपाल यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
  • तेजपाल मे २०१४ पासून जामिनावर आहेत.
  • त्यानंतर याप्रकरणाची चौकशी करत असलेल्या गोवा पोलिसांनी २०१४ मध्ये तरुण तेजपाल यांच्याविरोधात २,८४६ पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं.

तरुण तेजपालांविरोधात लावण्यात आलेली कलमे

तरुण तेजपाल यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३४२, ३५४, ३५४-ए , ३७६ (२) आणि ३७६ (२) (के) या कलमांतर्गत खटला सुरु होता.

 

आधीच्या तारखेमुळे नवा वाद

तरुण तेजपाल यांच्या मुलीने न्यायालयाच्या निकालानंतर त्यांच्यावतीने एक निवेदन वाचून दाखवले. या निवेदनाखाली १९ मे अशी तारीख टाइप केली होती. नंतर ती हाताने खोडून २१ मे करण्यात आली. त्यामुळे तेजपाल यांना दोन दिवसांपूर्वीच निकाल कळला होता का, असा आक्षेप घेण्यात येत आहे. चुकून तारीख आधीची टाइप झाली असे सांगितले जात आहे. पण निकालासाठी न्यायालयाने १९ मे ही तारीख जाहीर केली होती, त्यामुळे आधीच निकाल त्यांना कळला होता, असा वाद निर्माण झाला आहे.

tarun letter

 

तरुण तेजपालांची निर्दोष मुक्तता झाली…पण सात वर्षांपूर्वीचे ते प्रकरण होते तरी काय? जाणून घेण्यासाठी वाचा:


Tags: goa governmenttarun tejpalउच्च न्यायालयगोवा सत्र न्यायालयतरुण तेजपालतहलका
Previous Post

पश्चिम रेल्वेत ३ हजार ५९१ जागी अॅप्रेटिसशिपची संधी

Next Post

स्टिंग ऑपरेशन, तरुण तेजपाल आणि बलात्काराच्या आरोपाचा तहेलका! तेव्हा काय घडलं?

Next Post
tarun (2)

स्टिंग ऑपरेशन, तरुण तेजपाल आणि बलात्काराच्या आरोपाचा तहेलका! तेव्हा काय घडलं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!