मुक्तपीठ टीम
डॉक्टर म्हणजे असा एक वर्ग ज्यावर जगातील बहुसंख्य लोक विश्वास ठेवतात. तर नेते, वकील मंत्रीआणि पत्रकार हा वर्ग असा आहे जिथे लोक कमी विश्वास ठेवतात. ग्लोबल ट्रस्टवर्थनेस इंडेक्स-२०२१ मध्ये ही माहिती उघड झाली आहे. फ्रान्सच्या इप्सॉस नावाच्या कंपनीने हा निर्देशांक जाहीर केला आहे. यासाठी त्यांनी जगातील २८ देशांमध्ये सर्वेक्षण केले.
यामध्ये भारत, अमेरिका, कॅनडा, रशिया आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या काळात जगभरात डॉक्टरांवरचा विश्वास वाढला आहे. विशेष गोष्ट अशी आहे की, भारतीय जनता सैन्य, शास्त्रज्ञ आणि शिक्षकांवर विश्वास ठेवते. जगभरातील लोक राजकारणी, सरकारी मंत्री, सरकारी कर्मचारी, बँकर, पत्रकार, न्यायाधीश आणि वकील यांच्यावर कमी विश्वास ठेवतात.
सर्वेक्षणात सहभागी लोकांनी सांगितले की, जगातील नेते तेच आहेत, जे आश्वासने देतात. पण ती पूर्ण होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. याशिवाय टीव्ही न्यूज अँकर्सवर भारतीयांनी नाराजी व्यक्त केली. त्यांचे म्हणणे आहे की, ‘आजचे न्यूज अँकर बातम्यांपेक्षा जास्त वाद घालतात. त्यांच्या बातम्याही विश्वासार्ह नाहीत.’ इप्सोसने हा इंडेक्स ९ मुद्द्यांच्या आधारे तयार केला आहे.
सर्वेक्षणात या व्यवसायांचा समावेश करण्यात आला
- डॉक्टर
- शास्त्रज्ञ
- शिक्षक
- सशस्त्र दल
- सामान्य लोक
- पोलीस
- न्यायाधीश
- वकील
- टीव्ही न्यूज अँकर
- पुजारी
- सरकारी कर्मचारी
- पत्रकार
- बँकर्स
- राजकारणी
- सरकारी मंत्री