Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठा समाजाला तीन हजार कोटींचे पँकेजची शेलारांची मागणी

June 10, 2021
in घडलं-बिघडलं
0
Ashish shelar

मुक्तपीठ टीम

मराठा समाजाला EWS आरक्षण मिळेल असा निर्णय महाभकास आघाडीने घेतला. ही आघाडी कर्तव्यशून आहेच, पण कर्तृत्वशून्य हा त्यांचा परिचय आहे. आता कर्तृत्व परावलंबी आहेत हे सिद्ध झालं. कारण १० टक्के ईडब्लूएस आरक्षण दिलं, त्यात ठाकरे सरकारचं कर्तृत्व काय? ते मोदी सरकारने दिलंय. त्यामुळे हे ठाकरे सरकार कर्तृत्वावरही परावलंबी आहे.

 

OBC च्या सुविधा मराठा विद्यार्थ्यांना द्या

आमची मागणी आहे, गायकवाड कमिशनने सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल सिद्ध करुन मराठा आरक्षण मिळालं. मात्र यांनी EWS आरक्षण जाहीर केलं, पण मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा सुरुच राहिल, असं शेलार म्हणाले.

 

EWS मध्ये टाकल्यामुळे मराठा समाज आर्थिक दुर्बल नाही, अशी मांडणी ठाकरे सरकारने करु नये. OBC ना मिळणाऱ्या सुविधा मराठा विद्यार्थ्यांना मिळाव्या यासाठी 3 हजार कोटीचं पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

 

शिवसेनेकडून मराठा मोर्चाची खिल्ली

शिवसेनेने भावनाशून्यपणे मराठा मोर्चाची खिल्ली उडवली. कर्तव्यशून्य होता हे गायकवाड आयोगाची बाजू मांडली नाही यावरुन सिद्ध झालं. सर्वोच्च न्यायालायने आरक्षण स्थगिती नाकारली, त्या गायकवाड आयोगाला तुम्ही गाळात टाकलंत. आता मराठा समाजाला आर्थिक मागासलेपणमध्ये टाकलं असलं तरी सामाजिक मागासलेपण गाळू नका, असं आवाहन मविआला करतोय, असं शेलार म्हणाले.

 

ओबीसींच्या आरक्षणाला नख लागू नये

ओबीसी राजकीय आरक्षण टिकवू शकलं नाही. स्थानिक स्वराज्य संस्थातील अतिरिक्त आरक्षणाचा खून मविआने पाडला. आरक्षणाचा मुडदा पडल्यानंतर वडेट्टीवार-भुजबळ हे सत्तेत मदमस्त कसे राहू शकतात? ओबीसींच्या आरक्षणाला नख लागू नये, ही आमची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.


Tags: bjp ashish shelarMaratha Reservationअँड आशिष शेलारओबीसी राजकीयमराठा आरक्षणमराठा समाज
Previous Post

“आटपाडी तालुक्याचा अन्याय दूर करणार, राष्ट्रवादीचा विधानसभेचा मी उमेदवार!”

Next Post

नगरविकासच्या पुढाकाराने राज्यभरात पोलिसांसाठी २ लाख हक्काची घरे निर्माण करणार

Next Post
eknath shinde

नगरविकासच्या पुढाकाराने राज्यभरात पोलिसांसाठी २ लाख हक्काची घरे निर्माण करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!