धार्मिक पुस्तकांसाठी गीता प्रेस जगप्रसिद्ध आहे. तिथं काम करणाऱ्या मेघसिंह चौहान यांनी ३३५ धार्मिक ग्रंथ आणि पुस्तके डिजिटल केली आहेत. मूळचे जोधपूर येथील रहिवासी मेघसिंग चौहान हे २५ वर्ष गीता प्रेस गोरखपूर येथे सहाय्यक व्यवस्थापक होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी गीता प्रेसची पुस्तके ई-बुक्समध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २०१७ मध्ये ऑनलाइन वाचनासह उच्चार देखील ऐकू शकता असे साधन निर्मित केले.
संस्थेत नोकरी करताना हे शक्य होत नसल्याने त्यांनी २०१७ मध्ये गीता प्रेसची नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतरही त्यांना अनेक ठिकाणांहून महिन्याला लाखो रुपयांच्या पॅकेजची ऑफर आली. मात्र, त्यांनी नकार दिला. फक्त एकच उद्देश होता की जर तरुणांच्या हातात मोबाइल असेल तर तरुण पिढीला संस्कार देणाऱ्या काही गोष्टीही या मोबाइलमध्ये पुरविल्या पाहिजेत. २०१८ पासून जोधपूरला परत आल्यानंतर त्यांनी गीता प्रेसची पुस्तके डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचे काम सुरू केले.
सतत दोन वर्षे राबत त्यांनी त्यासाठी गीता सेवा ट्रस्ट अॅप तयार केले. ते सर्व साहित्य वेबसाइट, इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅपवर आणण्याचे काम सुरू केले. यासाठी लोकांच्या मदतीने गीता सेवा ट्रस्टची स्थापना केली आणि अवघ्या दोन वर्षांत ३३५ धार्मिक ग्रंथांचे हिंदी-इंग्रजीच्या ई-पुस्तकांमध्ये रूपांतर केले.
आज गीता सेवा ट्रस्टला साडेतीन लाख लोक डिजिटल प्लॅटफॉर्मवर जोडलेले आहेत. कन्नड, तामिळ, बांगलासह प्रादेशिक भाषांमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर धार्मिक पुस्तके आणण्याचे काम आता सुरू आहे. २०२१ पर्यंत गीता प्रेसची पुस्तके बहुतांश प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होतील. त्याच प्रमाणे ती सारी पुस्तके डिजिटल वाचकांना निशुल्क मिळतील.
सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पुस्तक वाचल्यामुळे आपल्याला प्रत्येक शब्दाचे शुद्ध उच्चार एकाच वेळी ऐकायला मिळते. म्हणजेच, जर आपण रामायण वाचत असाल तर अॅपवर असलेले उच्चार देखील ऑडिओमध्ये वाजेला जातो. त्यामुळे पुस्तक मोबाईलवर वाचण्यास त्रास होत असेल तर त्याची ऑडिओ ऐकण्यास सहाय्य होईल.