Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मानसिक नैराश्यातून सोळा वर्षांच्या मुलीची आत्महत्या

खार येथील राहत्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेतली

January 6, 2021
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
girl commits suicide

नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी खार येथे जान्हवी कुकरेजा या तरुणीच्या हत्येची घटना ताजी असतानाच मानसिक नैराश्यातून एका सोळा वर्षांच्या मुलीने तिच्या मैत्रिणीला मोबाईलवरुन आत्महत्येचा मॅसेज पाठवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खार परिसरात उघडकीस आली आहे. ही मुलगी सोळा वर्षांची असल्याने तिचे नाव सांगण्यास पोलिसांनी नकार दिला, तिच्याकडे पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही, त्यामुळे तिने आत्महत्या का केली याचा उलघडा होऊ शकला नाही. याप्रकरणी तिच्या आई-वडिलांची जबानी नोंदवून खार पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान या मुलीच्या आत्महत्येने खार परिसरात प्रचंड शोककळा पसरली आहे.

 

 

मंगळवार ५ जानेवारीला सायंकाळी लिलावती रुग्णालयातून खार पोलिसांना एक माहिती प्राप्त झाली होती, त्यात एक सोळा वर्षांची मुलगी तिच्या राहत्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन पडून जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु होते, उपचारादरम्यान सायंकाळी पावणेसहा वाजता तिचा मृत्यू झाला. या माहितीनंतर खार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती, घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांना ही सोळा वर्षांची मुलगी खार येथील सोळावा रस्ता, पाली पाल्म इमारतीच्या फ्लॅट क्रमांक १०१ मध्ये राहत असल्याचे समजले, तिचे आई-वडिल आणि तीन भावडांसोबत ती राहत होती. २ जानेवारीला ते सर्वजण लोणावळा येथे सुट्टीसाठी गेले होते, ३ जानेवारीला त्यांची सोळा वर्षांची मुलगी मैत्रिणीचा वाढदिवस असल्याने लोणावळा येथे दुसर्‍या ठिकाणी गेली होती, सोमवारी ४ जानेवारीला ते सर्वजण घरी आले, मात्र ही मुलगी तिथे होती, ती मंगळवारी दुपारी दिड वाजता घरी आली. त्यानंतर ती तिच्या बेडरुममध्ये गेली आणि तेथूनच तिने दहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार इमारतीचा सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास येताच त्याने ही माहिती मुलीच्या पालकांना दिली. त्यानंतर त्यांनी तिला लिलावती रुग्णालयात दाखल केले, तिथे तिला सायंकाळी पावणेसहा वाजता मृत घोषित करण्यात आले. ही माहिती मिळताच खार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिच्या पालकांची जबानी नोंदविण्यात आली असून या जबानीतून तिच्या आत्महत्येचा कारणाचा उलघडा होऊ शकला नाही.

 

 

ही मुलगी लोणावळा येथून आल्यापासून मानसिक तणावात होती, त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे, दरम्यान तिने तिच्या एका मैत्रिणीला मॅसेज करुन आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले होते, त्यामुळे या मैत्रिणीसह लोणावळा येथे तिला भेटलेल्या सर्व मित्रांची आता पोलिसांकडून चौकशी होणार आहे, या चौकशीनंतरच तिच्या आत्महत्येमागील कारणचा उलघडा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी खार येथे जान्हवी कुकरेजा या तरुणीची हत्या झाली होती, या हत्येप्रकरणी तिच्याच दोन मित्रांना खार पोलिसांनी अटक केली होती, या घटनेला आता पाच दिवस उलटत नाही तोवर अन्य एका मुलीने तिच्या राहत्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे.


Tags: girl commits suicidejanhavi kukrejamumbai policesuicideआत्महत्याजान्हवी कुकरेजा
Previous Post

लॉकडाऊनमध्ये ‘तो’ अनाथांसाठी केस कापायला शिकला!

Next Post

मुक्तपीठ – बजावा हक्क, व्हा अभिव्यक्त!

Next Post
muktpeeth

मुक्तपीठ – बजावा हक्क, व्हा अभिव्यक्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!