मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पक्षाचा पुर्नबांधणीसाठी चांगलेच सक्रीय झाले आहे. आदित्य ठाकरे सध्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन शिवसंवाद यात्रा घेत आहेत. आदित्य ठाकरे हे यांचा आज जळगाव जिल्ह्याचा दौरा आहे. या दौऱ्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. जर हेच दौरे आधी केले असते तर पक्षाला त्याचा थोडा फायदा झाला असता व आज जी परिस्थिती आहे ती बघायला मिळाली नसती, अशी टीका महाजनांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.
तर पक्षाला त्याचा थोडा फायदा झाला असता!!
- आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला आता काय अर्थ, त्यांच्या दौऱ्याला आता उशीर झाला आहे.
- हे काम त्यांनी आधीच करायला पाहिजे होतं.
- आता पक्षातून सर्व गेले आहेत, सर्व मावळे निघून गेले आहेत, शिलेदार निघून गेले आहेत आणि ते आता दौरे करत आहेत.
- जर हेच दौरे आधी केले असते तर पक्षाला त्याचा थोडा फायदा झाला असता व आज जी परिस्थिती आहे ती बघायला मिळाली नसती.
जळगावात आज आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा
- युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज जळगाव जिल्ह्यात येत आहे.
- पाचोरा धरणगाव पारोळा या बंडखोरांच्या मतदारसंघात त्यांच्या सभा होणार आहेत.
- शिव संवाद” यात्रा दौरा आज दुपारी एक वाजता धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकजवळ आयोजित केली आहे.
- यानिमित्ताने धरणगाव शहरात शिवसेना व युवा सेनेकडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत बॅनर जागोजागी लावले आहेत.