Tuesday, September 29, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

घरबसल्या काही मिनिटात ‘आधार’वरून मिळवा पॅनकार्ड

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
pan-card

मुक्तपीठ टीम

बँक खाते उघडणे, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे किंवा शेअर बाजारसारख्या अनेक आर्थिक कामात पॅनकार्ड आवश्यक आहे. एवढचं नाही तर बँकेत ५०,००० हून अधिक रक्कम काढायची असेल, वाहन खरेदी अशा अनेक कामांसाठी पॅन कार्ड मागितलं जातं. त्यामुळे प्रत्येकाचं पॅन कार्ड असणं अतिशय आवश्यक आहे. जर आपण अद्याप पॅनकार्ड काढलेले नसेल आणि आता त्याची गरज असेल तर घाबरून जाऊ नका. तुम्हाला आधार कार्डच्या माध्यमातून १० मिनिटांपेक्षा कमी वेळात पॅन कार्ड मिळू शकतं.

 

आधारकार्डद्वारे ई-पॅन कार्ड मिळवण्याची सुविधा पूर्णपणे विनामूल्य आहे. यासाठी तुम्हाला आयकर वेबसाइटवरून पॅनकार्डसाठी अर्ज करावा लागेल. ई-पॅनसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला केवळ  १२-अंकी आधार क्रमांक टाकायचा आहे. हे लक्षात ठेवा की मोबाइल नंबरला आधार क्रमांकासह जोडणे आवश्यक आहे.

 

ई-पॅन कार्ड प्रक्रिया 

१-  आयकर विभागाच्या https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वेबसाईटवर जा.

२- आता होम पेज वर ‘क्विक लिंक्स’ सेक्शनमध्ये जा आणि ‘इन्स्टंट पॅन थ्रू आधार’ वर क्लिक करा.

३- नंतर ‘Get new pan’ या लिंकवर क्लिक करा. हे आपल्याला इन्स्टंट पॅन रिक्वेस्ट वेब पेजवर घेऊन जाईल.

४- त्यानंतर आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड भरावा लागेल.

५- आता ‘जनरेट आधार ओटीपी’ वर क्लिक करा. आपल्याला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी मिळेल.

६-  मजकूर बॉक्समध्ये ओटीपी भरा आणि ‘ वेलिडेट आधार ओटीपी’ वर क्लिक करा. यानंतर, ‘कंटीन्यू’ बटणावर क्लिक करा.

७-  त्यानंतर तुम्हाला पॅन विनंती सबमिशन पेजवर रिडायरेक्ट केले जाईल. तिथे आपल्याला आपल्या आधार डिटेलची पुष्टी करावी लागेल आणि अटी व शर्ती मान्य कराव्या लागतील.

८-  यानंतर ‘सबमिट पॅन रिक्वेस्ट’ वर क्लिक करा.

९- आता या नंतर, एक नोंदणी क्रमांक तयार केला जाईल. आपण या नोंदणी क्रमांकाची नोंद घ्या.

पॅन कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया

  • यासाठी, आपल्याला पुन्हा  आयकर विभागाच्या ई-फाईलिंग वेबसाईटच्या होम पेजवर ‘क्विक लिंक्स’ सेक्शन वर जा आणि ‘इन्स्टंट पॅन थ्रू आधार’ वर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर आपण ‘चेक स्टेटस / डाऊनलोड पॅन’ या बटणावर क्लिक करा.
  • तिथे तुम्ही आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरुन पॅन कार्डची स्थिती तपासू शकता.
  • तसंच आपण आपले पॅनकार्ड तिथून डाउनलोड करू शकता.

Tags: Aadhaar cardpan cardआधारकार्डई-पॅन कार्ड
Previous Post

स्वाभिमानी वेगळी लढली तर पंढरपुरात राष्ट्रवादीसाठी अडचण!

Next Post

मैदान क्रिकेटचे…माजी कर्णधार फडणवीसांची फटकेबाजी राजकीयच!

Next Post
devendra fadanvis (2)

मैदान क्रिकेटचे...माजी कर्णधार फडणवीसांची फटकेबाजी राजकीयच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!