मुक्तपीठ टीम
बँक खाते उघडणे, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे किंवा शेअर बाजारसारख्या अनेक आर्थिक कामात पॅनकार्ड आवश्यक आहे. एवढचं नाही तर बँकेत ५०,००० हून अधिक रक्कम काढायची असेल, वाहन खरेदी अशा अनेक कामांसाठी पॅन कार्ड मागितलं जातं. त्यामुळे प्रत्येकाचं पॅन कार्ड असणं अतिशय आवश्यक आहे. जर आपण अद्याप पॅनकार्ड काढलेले नसेल आणि आता त्याची गरज असेल तर घाबरून जाऊ नका. तुम्हाला आधार कार्डच्या माध्यमातून १० मिनिटांपेक्षा कमी वेळात पॅन कार्ड मिळू शकतं.
आधारकार्डद्वारे ई-पॅन कार्ड मिळवण्याची सुविधा पूर्णपणे विनामूल्य आहे. यासाठी तुम्हाला आयकर वेबसाइटवरून पॅनकार्डसाठी अर्ज करावा लागेल. ई-पॅनसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला केवळ १२-अंकी आधार क्रमांक टाकायचा आहे. हे लक्षात ठेवा की मोबाइल नंबरला आधार क्रमांकासह जोडणे आवश्यक आहे.
ई-पॅन कार्ड प्रक्रिया
१- आयकर विभागाच्या https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वेबसाईटवर जा.
२- आता होम पेज वर ‘क्विक लिंक्स’ सेक्शनमध्ये जा आणि ‘इन्स्टंट पॅन थ्रू आधार’ वर क्लिक करा.
३- नंतर ‘Get new pan’ या लिंकवर क्लिक करा. हे आपल्याला इन्स्टंट पॅन रिक्वेस्ट वेब पेजवर घेऊन जाईल.
४- त्यानंतर आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड भरावा लागेल.
५- आता ‘जनरेट आधार ओटीपी’ वर क्लिक करा. आपल्याला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी मिळेल.
६- मजकूर बॉक्समध्ये ओटीपी भरा आणि ‘ वेलिडेट आधार ओटीपी’ वर क्लिक करा. यानंतर, ‘कंटीन्यू’ बटणावर क्लिक करा.
७- त्यानंतर तुम्हाला पॅन विनंती सबमिशन पेजवर रिडायरेक्ट केले जाईल. तिथे आपल्याला आपल्या आधार डिटेलची पुष्टी करावी लागेल आणि अटी व शर्ती मान्य कराव्या लागतील.
८- यानंतर ‘सबमिट पॅन रिक्वेस्ट’ वर क्लिक करा.
९- आता या नंतर, एक नोंदणी क्रमांक तयार केला जाईल. आपण या नोंदणी क्रमांकाची नोंद घ्या.
पॅन कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया
- यासाठी, आपल्याला पुन्हा आयकर विभागाच्या ई-फाईलिंग वेबसाईटच्या होम पेजवर ‘क्विक लिंक्स’ सेक्शन वर जा आणि ‘इन्स्टंट पॅन थ्रू आधार’ वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर आपण ‘चेक स्टेटस / डाऊनलोड पॅन’ या बटणावर क्लिक करा.
- तिथे तुम्ही आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरुन पॅन कार्डची स्थिती तपासू शकता.
- तसंच आपण आपले पॅनकार्ड तिथून डाउनलोड करू शकता.