जनरल : १)हे वर्ष सर्वाधिक उकडायचे मानले जात आहे त्यामुळे शहरातील वाढत्या उकाड्यामुळे सर्वच प्रवासी त्रासलेले आहेत. प्रवाशांनी आता आता लोकल ट्रेन कडून एसी लोकलकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार महिन्यांत मध्य रेल्वेच्या एसी लोकलच्या प्रवासी संख्येत हळुहळू वाढ होताना दिसत येत आहे तसेच या काळात ५२ हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवासाचा लाभ घेतला आहे. २) रिलायन्स जिओ कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लान्स घेऊन येत असते. रिलायन्स जिओ कंपनीने नुकतीच आपल्या प्रीपेड प्लान्सला कॅटेगरीत विभागले आहे.सुपरल व्हॅल्यू, बेस्टसेलर, आणि ट्रेडिंग या कॅटेगरीमध्ये जिओने प्रीपेड प्लानचा समावेश केला आहे. १९९ रुपयांच्या किंमतीत पोस्टपेड आणि प्रीपेड प्लान उपलब्ध केले आहे. जिओन या प्लानपैकी१९९ रुयांच्या प्लानला बेस्ट सेलर कॅटेगरीत ठेवले आहे. ३) आजकालच्या वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे निसर्गाचा समतोल बिघडल्याने सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांचे होते.ऐन उन्हाळ्यात पिकांची काढणी सुरू असताना वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली. त्यामुळे काढणीला आलेल्या आणि काढणी झालेल्या पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शनिवारी सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास गारपीट झाली व शेतात आणि रस्त्यांवरही गारांचा खच पडला होता. आधीच करूना मुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा नुकसानीचा फटका बसला. ४) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पुन्हा दिसून येत आहे अशातच.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहिती त्या ८ राज्यांमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि हरयाणाचा समावेश आहे. या राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीसह देशातील आठ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशात ४० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले असून यातील बहुतेक रुग्ण हे या आठ राज्यांमधील आहेत. केरळमध्येही नवीन रुग्णांची संख्या अधिक आहे. पण तेथील रुग्णवाढीचा ट्रेंड अजूनही घटणाराच आहे. ५) खासदार संजय राऊत हे शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनातील लेख, अग्रलेख, पत्रकार परिषदा आणि वृत्तवाहिन्यांवर मुलाखतीच्या माध्यमातून शिवसेना पक्षाची भूमिका मांडत असतात.ते या सोबतच फेसबुक व ट्विटरवरही ते अनेकदा पोस्ट करत असतात.त्यांच्या सोशल मीडियातून विरोधकांवर निशाणा साधताना ते व्यंगचित्रे व शेरोशायरीवर भर देत असतात.आजही त्यांनी असाच एक शेर ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, यावरुन आता चर्चा रंगली आहे.