Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतात प्रथमच, ‘जीन थेरपी’ने ८ वर्षीय कर्करोगग्रस्त चिमुरडीचे प्राण वाचवण्यात यश!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Tata Memorial Hospital

मुक्तपीठ टीम

कॅमेरिक अँटीजेन रिसेप्टर टी-सेल (CAR-T) थेरपी कर्करोगाच्या उपचारात रामबाण उपाय म्हणून उदयास आली आहे. जगभरात चालू असलेल्या क्लिनिकल चाचण्यांनी शेवटच्या टप्प्यातील कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम दाखवले आहेत. तीन महिन्यांपूर्वी आठ वर्षांच्या चिमुरडीच्या पालकांना ती काही आठवड्यांची पाहुणी असल्याचे समजले. या चिमुरडीला रक्ताचा कर्करोग होता. टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉक्टर २०२० पासून तिच्यावर उपचार करत आहेत. डॉक्टरांनी तिच्या पालकांसमोर पर्याय ठेवला. जीन थेरपीच्या घरगुती आवृत्तीचा पर्याय होता. ही पद्धत पाश्चिमात्य देशांमध्ये वापरली जाते. इगतपुरीजवळील एका खेडेगावातील चालक असणाऱ्या तिच्या वडिलांकडे दुसरा पर्याय नव्हता. मुलीची अवस्था फारच वाईट होती, तिचं जगणंही कठीण होतं. तिच्या वडिलांनी या उपचाराला होकार दिला आणि तिचे प्राण वाचले.

मुलीच्या वडिलांनी सांगितले की, “आठवड्याच्या सुरुवातीला त्यांनी खारघरमधील टाटा मेमोरियल सेंटरच्या संशोधन शाखा ACTREC ला भेट दिली. या उपचाानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितले की त्यांच्या मुलीच्या रक्तात कर्करोगाच्या पेशी आढळल्या नाहीत. दोन वर्षांत ती पहिल्यांदाच सामान्य दिसली.”

CAR-T म्हणजे काय?

  • CAR-T सेलच्या इम्युनोथेरपीचे एक नवीन रूप आहे.
  • टी-सेल थेरपी ही लॅबमध्ये टी पेशी (एक प्रकारची पांढऱ्या रक्तपेशी) नावाच्या रोगप्रतिकारक पेशींमध्ये बदल करण्याची एक पद्धत आहे ज्यामुळे ते कर्करोगाच्या पेशी शोधून त्यांचा नाश करू शकतात.
  • कर्करोग हा असामान्य पेशींची अनियंत्रित वाढ आणि शरीरातील ऊतींचा नाश यामुळे होणारा आजार आहे.
  • ल्युकेमिया हा रक्त कर्करोगाचा एक प्रकार आहे जो शरीरातील रक्त-उत्पादक ऊतींचा कर्करोग आहे.
  • ल्युकेमियाचे अनेक प्रकार आहेत. त्याच्या उपचारासाठीही विविध पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यापैकी एक CAR-T सेल थेरपी आहे.

या थेरेपीची ६पैकी ५ रुग्णांवर यशस्वी उपचार

  • आणखी एक ८ वर्षांचा मुलगा, ज्याला सहा महिन्यांपूर्वी CAR-T चे इंजेक्शन दिले होते, त्याचा देखील कर्करोग बरा झाला आहे.
  • सहा रुग्णांपैकी फक्त एकाने CAR-T पेशींना प्रतिसाद दिला नाही.
  • आयआयबी-टीएमसी टीम दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांसाठी तयारी करत आहे.
  • ज्यामध्ये ५० रुग्णांना CAR-T सेल दिल्या जातील.

Tags: ACTRECCAR-TGene Therapygood newsGood news MorningTata Memorial Hospitalजीन थेरपीटाटा मेमोरियल सेंटर
Previous Post

आणखी एक प्रकल्प गुजरातला! क्रिकेट सत्तेसाठी एकवटणारे मराठी राजकारणी महाराष्ट्र हितासाठी कधी एकवटणार?

Next Post

राष्ट्रीय साखर संस्थेकडून शाळांमध्ये कापडी पिशव्यांचे वाटप

Next Post
Clothes Bags In Kanpur

राष्ट्रीय साखर संस्थेकडून शाळांमध्ये कापडी पिशव्यांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!