Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कालचे सारे मुके, आज बोलू लागले…

गोंदियामधील खेडेगावातून साहित्य संमेलनातील काव्यसंग्रहापर्यंतची एका वाटचालीची कहाणी

September 6, 2026
in विशेष
0
Meghraj Meshram 15-12-21

गजानन जानभोर 

मेघराज मेश्राम हा तरुण पत्रकार. तो मूळचा गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी नजीकच्या घिवारी या खेड्यातील. मेघराज नागपुरातील ‘सकाळ‘ दैनिकात संपादकीय विभागात आहे. वडील दहा वर्षापूर्वी गेले, मागच्या वर्षी आई गेली. मेघराज स्वतःबद्दल फारसं कुणाशी बोलत नाही. फक्त लिहीत असतो. अतिशय कष्टातून तो इथवर आला आहे.

 

नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्याच्या ‘ माणूस असण्याच्या नोंदी‘ या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले, तेव्हा इथल्या प्रस्थापितांना धक्का बसला. काहींना अप्रूप तर त्याला ओळखणाऱ्यांना कौतुक वाटले. त्याचे संपादक संदीप भारंबे आणि सहकाऱ्यांनी त्याचा सत्कार केला.

 

मेघराज अत्यंत प्रतिभावंत पण उपेक्षित आहे. महाराष्ट्र आणि देशातील सर्व नामांकित नियतकालिकांमध्ये त्याच्या कविता प्रसिद्ध होतात. खेदाची बाब ही की, विदर्भातील प्रथितयश साहित्य संस्थांना त्याची दखल कधी घ्यावीशी वाटली नाही. मेघराज कुठल्याही व्यासपीठावर दिसत नाही. पुरस्काराच्या गर्दीत सुद्धा तो नसतो. पण त्याचा पहिलाच काव्यसंग्रह ‘लोकवाङ्मय गृह’ या अतिशय प्रतिष्ठित आणि चोखंदळ प्रकाशनाने प्रकाशित केला, यातच मेघराजच्या कवितेचे सामर्थ्य दडलेले आहे.

 

तुम्ही कितीही दाबून ठेवला तरी हिरा कधीतरी चकाकतोच. त्याला परप्रकाशाची गरज पडत नाही.

प्रत्येकाला आयुष्यात एक संधी हवी असते, मेघराजला ती या निमित्ताने मिळाली आहे. शेवटी तो ‘मेघ‘ आहे. त्याला कुणी अडवू शकत नाही. आता बघा पुढचा काळ त्याचाच आहे.

अभिनंदन मेघराज 🙏🏻🙏🏻🙏🏻

मेघराज मेश्राम : +91 86056 53678

Gajanan Janbhor -15-12-21

(गजानन जानभोर हे मुक्त पत्रकार असून राजकीय – सामाजिक विश्लेषक आहेत.)

ट्विटर: @gajananjanbhor

 


Tags: gajanan janbhormannos asanyachya nondimeghraj meshrampoetकवीगजानन जानभोरमाणूस असण्याच्या नोंदीमेघराज मेश्राम
Previous Post

भारतीय स्टेट बँकेत सीबीओ पदाच्या १,२२६ जागांसाठी भरती

Next Post

सीमाभागात मराठी भाषिकांवरील हल्ल्याप्रकरणी भाजपा गप्प का? नाना पटोलेंचा प्रश्न

Next Post
nana patole

सीमाभागात मराठी भाषिकांवरील हल्ल्याप्रकरणी भाजपा गप्प का? नाना पटोलेंचा प्रश्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!