मुक्तपीठ टीम
भारतातील सर्वात मोठी नैसर्गिक गॅस प्रक्रिया आणि वितरण कपंनी ‘गेल इंडिया लिमिटेड’ म्हणजेस गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात किमान एक गीगावॅटचा पोर्टफोलिओ तयार करणार आहे. यासोबतच कॉम्प्रेस्ड बायोगॅस आणि इथेनॉल प्रकल्पाच्या स्थापनेसाठी सुमारे पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नैसर्गिक गॅस व्यतिरिक्त इतर व्यवसायांचा विस्तार करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
स्वच्छ ऊर्जा म्हणजे काय?
• ज्या ऊर्जोच्या निर्मितीत प्रदूषण होत नाही, निसर्गाची हानी होत नाही, ती ऊर्जा स्वच्छ ऊर्जा म्हणून ओळखली जाते.
• सौर आणि पवन ऊर्जेपासून निर्माण होणारी ऊर्जा सर्वात स्वच्छ ऊर्जेचा स्त्रोत आहे.
• तसेच शहरी कचऱ्याचे बायोगॅसमध्ये रुपांतरीत करुन इंधनाची उपलब्धता वाढविता येऊ शकते.
GAIL supports the SATAT initiative to promote Compressed Biogas usage in India. Setting up of a CBG plant in Ranchi, Jharkhand by GAIL is another step towards giving impetus to greener energy and moving towards a gas-based economy. #FridayForecasts pic.twitter.com/Fp5NQuQtzt
— GAIL (India) Limited (@gailindia) July 2, 2021
गेल इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज जैन म्हणाले की, स्वच्छ ऊर्जा अंतर्गत गेल वापर केंद्रांना गॅस स्त्रोतांशी जोडण्यासाठी पाइपलाइनची सुविधा निर्माण करणार आहे. तर नवीकरणीय ऊर्जेच्या विकासासाठी ४,००० कोटींचा खर्च करणार आहे. तसेच कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प आणि इथेनॉल प्रकल्प उभारल्यास सुमारे ८०० ते १,००० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
पुढे जैन म्हणाले की, पर्यावरणास अनुकूल असणाऱ्या गॅस व्यवसायात आम्ही पहिल्यापासूनच आहोत. तर आता आम्ही कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषणाची समस्या कमी करण्यासाठी सरकार आणि पंतप्रधानांच्या दुष्टीने अनुरुप असणाऱ्या ग्रीन एनर्जीत व्यावसायाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहोत.
याव्यतिरिक्त गेल इथेनॉल युनिट्स देखील स्थापित करणार आहे. जेणे करुन कृषि कचरा आणि ऊसापासून प्रदूषण कमी करणाऱ्या इंधन बनवता येईल. तसेच इथेनॉलला पेट्रोलमध्ये मिसळले जाऊ शकते. त्यामुळे भारतात होणारी पेट्रोलची आयात कमी होईल.